शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसांत ६० वर आॅनलाईन अर्ज

By admin | Updated: September 3, 2014 23:16 IST

वाहन चालविण्याचा परवाना मिळविण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात नागरिकांना नेहमी चकरा माराव्या लागतात. यात आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागतो. हे करूनही अनेकवेळा परवाना मिळतोच,

तत्काळ मिळाले परवाने: नागरिकांचा त्रास होणार कमीचंद्रपूर : वाहन चालविण्याचा परवाना मिळविण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात नागरिकांना नेहमी चकरा माराव्या लागतात. यात आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागतो. हे करूनही अनेकवेळा परवाना मिळतोच, असे नाही. परवाना मिळवून देण्याचे आश्वासन देवून अनेकवेळा दलाल नागरिकांची लुट करतात. हे सर्व टाळण्यासाठी आता आॅनलाईन अर्ज प्रणाली सुरु केली आहे. या प्रणालीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दिवशी ३ तर, दुसऱ्या दिवशी तब्बल ३० शिकाऊ परवान्यासाठी आॅनलाईन अर्ज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला प्राप्त झाले. विशेष म्हणजे, या सर्वांना तत्काळ परवाना सुद्धा मिळाला आहे. त्यामुळे नागरिकांनी या प्रणालीचे स्वागत केले आहे. दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. अनेकवेळा वाहन धारकांजवळ वाहन चालविण्याचा परवाना नसतो. अशावेळी वाहतूक पोलीस दंड आकारतो. यातून सुटका मिळावी तसेच वाहतुकीचे नियम प्रत्येक वाहनधारकांना कळावे यासाठी आरटीओ कार्यालयाकडून वाहन परवाना मिळविणे गरजेचे आहे. मात्र हा परवाना मिळविताना अनेकवेळा वाहनधारकांना मोठी अडचण निर्माण होत होती. आता उमेदवारांना आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली. या प्रक्रियेमध्ये पहिल्या दिवशी तीन तर, दुसऱ्या दिवशी ३० च्या वर उमेदवारांनी अर्ज सादर केले. विशेष म्हणजे ज्यावेळी अर्ज सादर केला जातो त्याचवेळी उमेदवारांना चाचणी आणि कागदपत्र तपासणीसाठी येण्याची वेळ एसएमएसद्वारे कळविली जाते. त्यानुसार दोन दिवसामध्ये उमेदवारांना एसएमएसद्वारे माहिती मिळाली. सोबतच संगणकीय माध्यमातून वाहतूक चिन्हांची चाचणीसुद्धा घेण्यात आली. ही चाचणी एकावेळी ३० उमेदवारांना देता येते. ज्या उमेदवारांनी अर्ज भरले त्यांना शिकाऊ परवान्याचे वितरणही करण्यात आले आहे. नियमानुसार परवाना काढणे कठिण नसले तरी, बहुतांश कार्यालयात दलाल सक्रीय असतात. त्यामुळे परवाना काढताना अनेकवेळा आर्थिक लुट केली जाते. असा आरोप नागरिक नेहमी करतात. अनेकवेळा वाहनधारक आणि अधिकाऱ्यांमध्ये खटकेही उडतात. नागरिकांचा त्रास कमी व्हावा, विनाविलंब आणि नियमानुसार त्यांना परवाना मिळावा यासाठी ही प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. (नगर प्रतिनिधी)