शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत तक्रारीच्या निपटाऱ्यासाठी ‘एक गाव-एक दिवस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:28 IST

चंद्रपूर : थेट गावात जाऊन वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांसह वीजबिल दुरुस्ती, नवीन वीजजोडणी या त्रिसूत्री मोहिमेतील ‘एक गाव-एक ...

चंद्रपूर : थेट गावात जाऊन वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांसह वीजबिल दुरुस्ती, नवीन वीजजोडणी या त्रिसूत्री मोहिमेतील ‘एक गाव-एक दिवस’ हा उपक्रम महावितरणने हातात घेतला आहे. या उपक्रमाला बल्लारपूर विभागांतर्गत वरुड रोड येथून सुरुवात करण्यात आली. यावेळी ११३ दुरुस्तीची कामे, १ कृषिपंप जोडणी व ४३ तक्रारींचा निपटारा करण्यात आला. यावेळी कृषी धोरण २०२० बाबत माहिती व वीजबिलाची थकबाकी वसुलीसंदर्भात ग्रामपंचायतींचा सहभाग यावरही मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी आमदार संजय धोटे, चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी स्वतः ग्राहकांच्या तक्रारी समजून घेतल्या. चंद्रपूर परिमंडल कार्यक्षेत्रात येणाऱ्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यात येत आहे. मागील वर्षी या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात ६८ गावांमध्ये एकत्रित ९६८ तक्रारींचे निवारण करण्यात आले होते. महावितरणचे नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम येत्या काळात अधिक गतिशील करण्यात येणार असल्याची माहिती, चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी दिली. ग्रामीण भागात सुरळीत वीजपुरवठ्यासाठी जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील काही गावांत ‘एक गाव - एक दिवस’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या मोहिमेत गावकऱ्यांशी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी थेट संवाद साधून मोबाइल ॲप, वीजसुरक्षा व ग्राहकसेवेबाबतच प्रबोधन करणार आहे. या उपक्रमासाठी मुख्य अभियंता सुनील देशपांडे, अधीक्षक अभियंत्या संध्या चिवंडे, सर्व कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता व कनिष्ठ अभियंता प्रयत्न करीत आहेत.

बॉक्स

ही कामे होणार

महावितरणकडून करण्यात येणाऱ्या कामामध्ये तारांमधील झोल काढणे, स्पेसर्स बसविणे, वीजपुरवठ्याला अडथळे ठरणाऱ्या झाडाच्या फांद्या तोडणे, पीन व डिस्क इन्सुलेटर बदलणे, वितरण रोहित्रांना अर्थिंग करणे, डिस्ट्रिब्युशन बॉक्सची स्वच्छता व आवश्यक दुरुस्ती, किटकॅट बदलणे, गांजलेले वीजखांब बदलणे, वाकलेले वीजखांब सरळ करणे, नादुरुस्त व धोकादायक सव्हिर्स वायर बदलणे, सदोष व नादुरुस्त वीजमीटर बदलणे, वीजबिलांची दुरुस्ती, वीजमीटरची तपासणी, नावात बदल, वीज देयके मिळत नसल्यास ते उपलब्ध करून देणे, मीटर घराबाहेर काढणे अशा प्रकारची कामे करण्यात येणार आहेत.