शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

एक हजार अंगणवाड्या डिजीटल करणार

By admin | Updated: January 21, 2016 01:11 IST

जिल्ह्यातील एक हजार अंगणवाड्या डिजीटल करणार असून त्यासोबतच प्रत्येक अंगणवाडीला जिल्हा परिषदेकडून लहान ट्रांजीस्टर रेडीओ देण्यात येणार आहे.

महेंद्र कल्याणकर : गोपालपूर व कुकुडसा अंगणवाडीला आयएसओ नामांकनचंद्रपूर : जिल्ह्यातील एक हजार अंगणवाड्या डिजीटल करणार असून त्यासोबतच प्रत्येक अंगणवाडीला जिल्हा परिषदेकडून लहान ट्रांजीस्टर रेडीओ देण्यात येणार आहे. तसेच लहान मुलांच्या सर्वांगीण विकास साधण्याकरिता जे काही जिल्हा परिषदेकडून करता येईल, ते आम्ही करू, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी केले. जिल्हा परिषद कन्नमवार सभागृहात आयोजित आयएमओ मानांकन सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा कल्पना बोरकर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बालकल्याण समिती सभापती सरिता कुडे, शिक्षण सभापती देवराव भोंगळे, जिल्हा परिषद सदस्य अल्का आत्राम, अंबुजा फाऊंडेशनचे सोपान नागरगोजे, आयएसओ सल्लागार नितीन वैद्य, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मोहीते उपस्थित होते.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कोरपना तालुक्यातील गोपालपूर व कुकुडसा या दोन अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन दर्जा प्रमाणपत्र प्रदान करण्यात आला. महेंद्र कल्याणकर पुढे म्हणाले, शासनातर्फे भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत गरोदर मातांना एक वेळचा सकस चौरस आहार देण्याबाबत काम ११५ अंगणवाड्यांमध्ये सुरू करण्यात आले आहे. यामध्ये अनुसुचीत क्षेत्रातील कुपोषीत प्रमाण कमी असून याचा लाभ गावातील प्रत्येक गरोदर मातांना मिळाला पाहिजे, याकरीता प्रयत्न करावे. तसेच लहान बालकांचा सर्वांगीण विकास कसे करता, येईल याकडे अंगणवाडी सेविकांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगितले.सभापती देवराव भोंगळे यांनी, जिल्ह्यातील गोपालपूर व कुकुडसा या दोन अंगणवाड्यांना जसे आयएसओ मानांकन मिळाले तसेच आपल्या प्रत्येक अंगणवाडीला आयएसओ मानांकन मिळाले पाहिजे, याकरीता प्रत्येक अंगणवाडीसेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी प्रयत्न करावे. गावातील अंगणवाडी केंद्र म्हणजे बाल प्रशिक्षण केंद्र व बालसंस्कार केंद्र असते. या अंगणवाडीतूनच उद्याचे भविष्य घडत असते, असे सांगितले.जिल्हा परिषद उपाध्यक्षा कल्पना बोरकर म्हणाल्या, समाजातील लहान बालकांना संस्कारमय करून त्यांना समाजात उभे राहण्याची ताकद ही अंगणवाडी केंद्रच देत असते. प्रत्येक वेळी शासनाच्या मदतीवर अवलंबून राहण्यापेक्षा गावातील लोकांना एकत्र आणून लोकवाट्यातून अंगणवाडी बोलकी करून आयएसओ करण्याचा प्रयत्न करावा. मुलांच्या कोऱ्या पाटीवर संस्कार घडवणारी कामे अंगणवाडी सेविका करत असते. त्यांनी दर महिन्याला गावात महिलांचे कार्यक्रम घेऊन वेगवेगळ्या विषयावर त्यांना मार्गदर्शन करावे, असे सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)