शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

एक किंवा दोन.. बस्स !

By admin | Updated: September 16, 2014 23:37 IST

काही वर्षापूर्वी कुटुंबनियोजनाचे महत्त्व नागरिकांना फारसे कळले नव्हते. त्यामुळे लोकसंख्या झपाट्याने वाढत होती. कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी अनेक प्रोत्साहनपर योजना शासनाला सुरु

११ हजारावर कुटुंबीयांनी केली नसबंदी : आरोग्य विभागाचे यशचंद्रपूर : काही वर्षापूर्वी कुटुंबनियोजनाचे महत्त्व नागरिकांना फारसे कळले नव्हते. त्यामुळे लोकसंख्या झपाट्याने वाढत होती. कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी अनेक प्रोत्साहनपर योजना शासनाला सुरु कराव्या लागल्या. तरीही याचा फारसा फायदा जाणवत नव्हता. अनेकवेळा शासकीय कर्मचाऱ्यांना कुटुंबनियोजनाचे ‘टॉर्गेट’ देण्यात येत होते. आता मात्र परिस्थिती बदली आहे. वाढती बेरोजगारी, महागाईमुळे तसेच तंत्रज्ञानाने जनजागृती झाली आहे. कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेसाठी नागरिक स्वत:हून समोर येत आहे. यामुळेच मागील वर्षी जिल्ह्यात ११ हजार ९०८ महिला, पुरुषांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली आहे.जिल्ह्यातील ९ हजार ८७६ कुटुंबीयांनी एक किंवा दोन मुलींवर शस्त्रक्रिया केली आहे. तर, चालु वर्षामधील पहिल्या पाच महिन्यात १ हजार ९९ कुटुंबीयांनी शस्त्रक्रिया आटोपल्या आहे. यातील ९८० जणांनी दोन मुलींवर शस्त्रक्रिया केली आहे. ही आकडेवारी शासकीय रुग्णालयातील आहे. तर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.सन २०१३-१४ मध्ये चंद्रपूर जिल्ह्याला शासनाने ११ हजार ६०० कुटुंबीयांंनी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्याचे टार्गेट दिले होते. आरोग्य विभागाने १०३ टक्के टॉर्गेट पूर्ण केले आहे. चालू वर्षामध्ये २०१४-१५ मध्ये ११ हजार ७०४ कुटुंब नियोजन पूर्ण करण्याचा मानस विभागाने व्यक्त केला आहे. प्रथम पाच महिन्यामध्ये एक हजार १९६ जणांवर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केली आहे. तर उर्वरित टार्गेट मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्याची निर्धार विभागाने व्यक्त केला आहे. (नगर प्रतिनिधी)