शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

एकाच वैद्यकीय अधिकारी सांभाळतो १८ गावांचा भार

By admin | Updated: September 18, 2014 23:33 IST

घुग्घुस शहराची लोकसंख्या ५० हजारांच्यावर आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रार्तगत जवळपास १८ गावे येतात. या अठरा गावांचा कारभार एकच वैद्यकीय अधिकारी सांभाळत आहे. घुग्घुस परिसरात

घुग्घुस : घुग्घुस शहराची लोकसंख्या ५० हजारांच्यावर आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रार्तगत जवळपास १८ गावे येतात. या अठरा गावांचा कारभार एकच वैद्यकीय अधिकारी सांभाळत आहे. घुग्घुस परिसरात सध्या तापाची साथ सुरू आहे. त्यामुळे एका अधिकाऱ्याला १८ गावांचा कारभार पाहताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. घुग्घूस परिसरात मोठ्या प्रमाणावर उद्योग आहेत. या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मागील अडीच महिन्यांपासून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे. या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी वाकदकर हे कार्यरत आहेत. त्यांना परिसरातील १८ गावांच्या आरोग्याची जबाबदार सांभाळावी लागत आहे. सध्या घुग्घूस परिसरात तापाची साथ सुरू आहे. त्याामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज अनेक रुग्ण तपासणीसाठी येतात.या सर्व रुग्णांना उपचार करताना त्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेकदा प्राथमिक आरोग्य केंद्रात लांबचलांब रांगा दिसून येतात. वातावरणातील बदलामुळे रोगराई पसरत आहे. मलेरिया डेंंग्यूसारख्या तापाची साथ आहे. तापाच्या साथीचे बरेच रुग्ण आहेत. त्यात एकच वैद्यकीय अधिकारी असल्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.शासनाने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या राहण्यासाठी रुग्णालयाच्या मागे निवासस्थाने बांधली आहेत. परंतु त्यांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. या परिसरात झाडेझुडपे वाढलेली आहेत. वीज पुरवठा नाही. घाणीचे साम्राज्य आहे. त्यामुळे तिथे कोणीही राहात नाही. शासनाने बांधलेली निवासस्थाने धूळखात आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांना भाड्याने राहावे लागत आहे. (वार्ताहर)