शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

डोंग्याने प्रवास करून केले गंगापूरचे शंभर टक्के लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2021 05:00 IST

पोंभुर्णा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश मामीडवार यांनी गंगापूर गावात १०० लसीकरणाची मोहीम हाती घेतली. आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन चेक ठाणेवासना येथून साध्या डोंग्याचा वापर करून गंगापूर गावात दाखल झाले. गावात आशा वर्कर व सामाजिक कार्यकर्त्यांना सोबत  घेऊन ३० ऑगस्टला कोव्हिशिल्ड लसीकरण सत्र आयोजित केले. गंगापूरची लोकसंख्या ३४० च्या आसपास आहे. पात्र १३६ नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने लस घेतल्याने शंभर टक्के लसीकरण केले. 

पी. एच. गोरंतवारलोकमत न्यूज नेटवर्कपोंभूर्णा : तालुक्याचे शेवटचे टोक असलेले गंगापूर व गंगापूर टोक ही दोन गावे दोन नद्यांच्या मधात वसलेली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगाव मोरेअंतर्गत या गावांमध्ये ये-जा करण्यासाठी फक्त डोंग्याचा वापर करावा लागतो. पावसाळ्यात दुथडी भरून वाहत जाणारी नदी  प्रचंड रौद्ररूप धारण करून असते. असे असताना आरोग्य विभागाने जीव धोक्यात घालून डोंग्याने नदी ओलांडत या गावातील नागरिकांचे १०० टक्के कोविड लसीकरण केले. पोंभुर्णा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश मामीडवार यांनी गंगापूर गावात १०० लसीकरणाची मोहीम हाती घेतली. आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन चेक ठाणेवासना येथून साध्या डोंग्याचा वापर करून गंगापूर गावात दाखल झाले. गावात आशा वर्कर व सामाजिक कार्यकर्त्यांना सोबत  घेऊन ३० ऑगस्टला कोव्हिशिल्ड लसीकरण सत्र आयोजित केले. गंगापूरची लोकसंख्या ३४० च्या आसपास आहे. पात्र १३६ नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने लस घेतल्याने शंभर टक्के लसीकरण केले. लसीकरणासाठी  तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश मामीडवार, तालुका सुपरवायझर सूरज डुकरे, आरोग्य सहायक गजानन मेश्राम, आरोग्य सेवक सत्यनारायण सकनेरपवार, आरोग्य सेविका आयशा मडावी, आरोग्य सेविका प्रियंका वाघमारे, आशा वर्कर पुष्पा डायले, वाहन चालक पराग चांदेकर, वाहनचालक पवन कोवे, चिंटू कावलवार यांनी  परिश्रम घेतले.

जीवघेणी नदी, तरीही दिली  आरोग्य सेवा१९ ऑगस्टला काही पाहुणे गंगापूर गावात जाण्यासाठी नदीतून डोंग्याने प्रवास करीत होते. अचानक पाण्याची पातळी वाढली व डोंगा पाण्यात बुडाला. यात एकाचा मृत्यू झाला व दोघे पोहता येत असल्याने बचावले. पावसाळ्यातील  ही भीषणता आहे. तरीही आरोग्य यंत्रणेने गंगापूर गावात आरोग्य सेवा दिली

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश मामीडवार यांनी नदीतून डोंग्याने प्रवास करीत कर्तव्य बजावले. गंगापूरसारख्या दुर्गम  गावात शंभर टक्के लसीकरण पूर्ण केले. अधिकारी व कर्मचारी हे  अभिनंदनास पात्र आहे.- गंगाधर मडावी,  सदस्य पंचायत समिती पोंभुर्णा

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसdoctorडॉक्टर