शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

आमदाराच्या आक्रमकतेने अधिकारी हादरले

By admin | Updated: August 28, 2016 00:40 IST

ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आ. विजय वडेट्टीवार यांनी दोन दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहात अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

आढावा बैठक : नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्यसिंदेवाही : ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आ. विजय वडेट्टीवार यांनी दोन दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. मागील आठ महिन्यांपासून जनतेच्या समस्या व तक्रारींचे पत्र आणि दूरध्वनीवरून सतत येत असल्याने प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करून त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता सिंदेवाही विभागातल्या पाचही आरोग्य केंद्रात डॉक्टर व औषधाची कमतरता असल्याने रुग्णाला उपचार बरोबर मिळत नाहीत. त्यामुळे डॉक्टर हे खासगी औषधी दुकानातून औषधी घेण्याचा सल्ला देतात. रुग्णाला पाहण्यासाठी डॉक्टर उपलब्ध नाही. त्यामुळे त्वरित उपाययोजना करून समस्या मिटविण्याचे आदेश देण्यात आले.पंचायत विभागाशी संलग्न संपूर्ण ग्रामीण भागातील नागरिक अवगत असल्याचे दिसते. ग्रामसेवकाच्या माध्यमातून गावात शासनाच्या योजना राबविल्या जातात. पण काही महिन्यांपासून पं.स. अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे गावात योजनेचा अभाव दिसत असल्याने विकास थांबला आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना या सर्व समस्यांबद्दल अवगत करण्यात आले.या व्यतिरिक्त एसटी महामंडळ विद्यार्थी पासेस व लांब पल्ल्याच्या बसेस सोडण्याबाबत चर्चा केली. तहसील विभाग, पोलीस विभाग, वन विभाग, कृषी विभाग, बांधकाम विभाग, रोपवन लागवड अधिकारी, राष्ट्रीयकृत बँकेच्या प्रतिनिधींशी दीर्घ चर्चा करून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे आदेश दिले. ही चर्चा करीत असताना नागरिकांसाठी आ. वडेट्टीवार यांनी अधिकाऱ्यांना सोडले नाही. त्यांना आक्रमकतेने प्रश्न विचारून उत्तर मागायचे. समाधान न झाल्यास त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दूरध्वनी करीत असताना अधिकारी मात्र धसकावीत होते.हे सर्व दृष्य पाहून नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. त्यांना १५ वर्षापूर्वीचे आमदार वडेट्टीवार असल्याचा भास होत होता. त्यावेळी ते शिवसेनेसोबत होते हे विशेष! (प्रतिनिधी)तक्रारींचा पाऊसविद्युत विभागाच्या अभियंत्याविरोधात तक्रारीचा पाऊस पाहून आमदार संतप्त झाले. त्यांनी वरिष्ठ अभियंत्याला दूरध्वनी करून नागरिकांच्या समस्याबद्दल अवगत केले. महावितरण दिवसरात्र भारनियमन करीत असल्याने शेतकरी मोटरपंपाद्वारे धानाला पाणी देऊ शकत नाहीत. त्यामुळे धान मरणावस्थेला पोहोचले आहेत. तालुक्याची विद्युत व्यवस्था त्वरित योग्य पद्धतीने करावी, असा आदेश त्यांनी दिला.