शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यावर गुन्हा

By admin | Updated: August 22, 2016 01:49 IST

पोलीस स्टेशन वरोराच्या आवारात नष्ट करण्यात आलेली दारू वरोरा शहरातील एका भंगार व्यवसायिकाकडे आढळून आली.

वरोरा पोलिसांची कारवाई : नष्ट केलेल्या दारूला पाय फुटलेवरोरा : पोलीस स्टेशन वरोराच्या आवारात नष्ट करण्यात आलेली दारू वरोरा शहरातील एका भंगार व्यवसायिकाकडे आढळून आली. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यावर वरोरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यावर अवैध दारू प्रकरणी पहिलाच गुन्हा दाखल झाल्याचे मानले जात आहे.वरोरा पोलीस स्टेशनच्या आवारात काही दिवसांपूर्वी परवानगीने लाखो रुपयांची देशी व विदेशी दारू नष्ट करण्यात आली. ही दारू नष्ट करताना पोलीस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी व कर्मचारी पंचासमक्ष दारू नष्ट करीत असतात परवानगी दिलेली संपूर्ण दारू नष्ट झाल्याचे सांगण्यात आले. सर्वकाही सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर नष्ट करण्यात आलेल्या देशी व विदेशी दारूपैकी काही दारू वरोरा शहरातील यात्रा रोड लगतच्या भंगार दुकानात आढळून आली. चंद्रपूर येथील स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकल्यावर गौडबंगाल उघडकीस आले. त्यानंतर भंगार व्यवसायिकास अटक करण्यात आली. याप्रकरणी दोन्ही विभागाकडून कमालीची गुप्तता पाळली जात होती. परंतु नष्ट केलेल्या दारूला पाय फुटल्याची चर्चा सुरू झाली. एलसीबीच्या धाडीनंतर अटक करण्यात आलेल्या भंगार व्यवसायिकाने आपण राज्य उत्पादन शुल्क अधिकारी भिमराव पाटील यांना २० हजार रुपये देवून दारू खरेदी केल्याचे आपल्या बयानात नमूद केले. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क अधिकारी भिमराव पाटील यांच्या विरोधात वरोरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)