शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासाठी ओबीसींचे चंद्रपुरात धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 22:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : राष्टष्ट्रीय ओबीसी महासंघ विद्यार्थी शाखेतर्फे व युवक शाखेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी सकाळी ११ ते ...

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राष्टष्ट्रीय ओबीसी महासंघ विद्यार्थी शाखेतर्फे व युवक शाखेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात आले.राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. नितीन कुकडे, उपाध्यक्ष डॉ. संजय बरडे, महासचिव प्रा. विजय मालेकर, विमाशिचे सहकार्यवाह सुधाकर अडबाले, संजय सपाटे, कुणाल चहारे, अ‍ॅड. भास्कर दिवसे, प्रा. बबन राजूरकर यांचे व शेकडो ओबीसी विद्यार्थी या आंदोलनाला उपस्थित होते. ओबीसीच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेकरिता हे आंदोलन करण्यात आले.या धरणे आंदोलनात जिल्हाध्यक्ष प्रा. नितीन कुकडे, महासचिव प्रा. विजय मालेकर, बबनराव फंड, बबनराव वानखेडे, प्रा. बबनराव राजूरकर, डॉ. संजय बरडे, सुधीर टिकले, संजय चवरे, सुभाष गोहोकार, बबनराव वानखेडे, मंगेश पाचभाई, विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निकीलेश चामरे, जिवन गाडगे, उमंग हिवरे, शुभम पवार, तुलेश मासिरकर, रोशन पाचभाई व ओबीसी समाजातील शेकडो विद्यार्थी, युवक समाज बांधव उपस्थित होते.अशा आहेत मागण्याओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करुन केंद्रात स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे, सर्व विद्यापीठातील १३ पार्इंट रोस्टर रद्द करुन २०० पार्इंट रोस्टर लागू करावे, ओबीसी विद्यार्थ्यांना केंद्रात १९९८ व राज्यात सन २००२-०३ पासून शंभर टक्के शिष्यवृत्ती लागू करण्यात आली होती. २९ मे २००३ च्या परिपत्रकानुसार अनुसूचित जाती जमातीच्या धरतीवर राज्य शासनाने शालांत परीक्षेत्तर शिष्यवृत्ती योजना लागू केली होती. सन २००२-०३, २००३-०४, २००४-०५, २००५-०६ या वर्षात शंभर टक्के शिष्यवृत्ती देण्यात आली. नंतर राज्य शासनाने ज्यांचे उत्पन्न एक लाखाच्या खाली आहे, त्यांना निर्वाह भत्ता शंभर टक्के व प्रशिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क ५० टक्के देण्यात येत आहे. शासन परिपत्रकानुसार ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी, व्यावसायिक कोर्समधील एमबीए, एमसीए, एमटेक, बीबीए, बीसीए, बीसीएस व नर्सिग या कोर्सेसना भारत सरकारची शिष्यवृत्ती देण्यात येत नाही. ही १०० टक्के शिष्यवृत्ती सुरु करण्यात यावी आदी मागण्या यावेळी लावून धरण्यात आल्या.