महादेव जानकर : चंद्रपूर येथे कार्यक्रमलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: ओबीसी समाजबांधवांनी एकत्र येऊन ओबीसी चळवळ उभारावी व त्यातून समाजाची उन्नती साधावी. या चळवळी चालवित असताना सरकारशी समायोजन करून घटनादत्त अधिकार मिळवावा. सोबतच लहान राज्य असणे हे समाजाच्या व प्रदेशाच्या उन्नतीसाठी चांगले आहे. लहान राज्यातून विकास साधता येतो, अशी भूमिका पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी येथे मांडली.ना. जानकर यांचा स्थानिक जनता शिक्षण महाविद्यालयातील ‘श्री-लीला’ सभागृहात चांदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने डॉ. अशोक जीवतोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सोबतच संस्थेचे प्राचार्य, मुख्याध्यापक, पदाधिकारी, शिक्षक यांनीही केला.ना. जानकर म्हणाले की, त्या काळात शिक्षण महर्षी कर्वे, डॉ. पंजाबराव देशमुख, श्रीहरी जीवतोडे गुरूजी यांनी महाराष्ट्रात ज्ञानगंगा घरोघरी पोहोचविली. त्यामुळे बहुजन समाजातील मुले शिक्षण घेऊ शकली. ते आज मोठ्या पदावर आहेत. ओबीसी समाज मोठा आहे, आता तो हळूहळू संघटित होत आहे. या समाजाने चळवळ मजबूत करायला हवी. प्राचार्य ओबीसी निमंत्रक सचिन राजूरकर, माजी प्राचार्य सुधाकर उमाटे, माजी मुख्याध्यापक रावजी चवरे, प्राचार्य डॉ. एम. सुभाष, विमाशिचे सहकार्यवाह सुधाकर अडबाले आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. अशोक जीवतोडे, संचालन प्रा. रवी वरारकर व आभार प्रा. महेश यार्दी यांनी मानले.
ओबीसी व छोट्या राज्याची चळवळ विकासात्मक
By admin | Updated: June 14, 2017 00:31 IST