शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेची संख्या वाढली, थांबे मात्र वाढेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:29 IST

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे मागील दीड वर्षापासून रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी विशेष एक्स्प्रेस चालविल्या जात आहेत. ...

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे मागील दीड वर्षापासून रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी विशेष एक्स्प्रेस चालविल्या जात आहेत. मात्र या गाड्या प्रत्येक रेल्वे स्टेशनवर थांबत नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दुसरीकडे स्पेशल ट्रेनच्या नावाखाली प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता सार्वजनिक वाहतूक सुरू झाली आहे. मात्र अद्यापही रेल्वे सेवा सुर‌ळीत सुरू झाली नाही. पॅसेंजर बंद असल्यामुळे जवळपासच्या गावांना रेल्वेने प्रवास करणे सध्यातरी बंद आहे. यामध्ये प्रवाशांना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर तसेच परिसरातील नागरिकांना मुंबई येथे जाण्यासाठी असलेली सेवाग्राम एक्स्प्रेसही बंद आहे. त्यामुळे येथील प्र‌वाशांना वर्धा येथून विशेष रेल्वे पकडावी लागत आहे. यामध्ये शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांना प्रत्येक रेल्वे स्टेशनवर थांबा द्यावा; नाही तर पॅसेंजर सुरू करून दिलासा द्यावा, अशी मागणी आता रेल्वे प्रवासी करीत आहेत.

बॉक्स

या ठिकाणी रेल्वे कधी थांबणार?

कोरोना संकटापूर्वी ज्या ठिकाणी रेल्वे थांबत होत्या आता त्यातील काही मोजक्याच ठिकाणी रेल्वे थांबत आहे. विशेष म्हणजे, सध्या पॅसेंजर बंद असल्यामुळे प्रवास करताना नागरिकांना मोठा त्रास होत आहे. त्यामुळे विशेष रेल्वे गाड्यांचे प्रत्येक रेल्वे स्टेशनवर थांबे द्यावेत, अशी मागणी केली जात आहे.

बाॅक्स

सध्या सुरू असलेल्या रेल्वे

नवजीवन

संघमित्रा

दक्षिण

जीटी

तामिलनाडू

तेलंगणा

बंगलोर - निजामुद्दीन

दानापूर - सिकंदराबाद

केरला

विशाखापट्टणम - नवी दिल्ली

यशवंतपूर - निजामुद्दीन

कोट...

थांबा नसल्याने आम्हाला होतोय त्रास

कोरोना संकटामुळे नियमित रेल्वे सेवा बंद आहे. यातील काही विशेष रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र त्या प्रत्येक रेल्वे स्टेशनवर थांबत नसल्यामुळे प्रवास करणे कठीण झाले आहे. त्यामुळे सेवाग्राम, आनंदवन या रेल्वे सुरू करून दिलासा द्यावा.

- श्रीकांत खडसे, चंद्रपूर

कोट

कोरोना संकटापूर्वी सेवाग्राम एक्स्प्रेस सुरू होती. त्यामुळे चंद्रपूर तसेच इतर ठिकाणाहून मुंबईला जाणे सोपे होते. मात्र आता ही रेल्वे बंद आहे. त्यामुळे प्रवाशांना वर्धा येथील स्टेशनवरून मुंबईला जावे लागते. त्यामुळे ही रेल्वे सुरू करणे अत्यावश्यक आहे.

- अनुप खुटेमाटे, भद्रावती

००

कोट

कोरोना संकटानंतर पॅसेंजर तसेच इतर एक्स्प्रेस बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाकडे या पॅसेंजर सुरू करण्यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला आहे. विशेष ट्रेनच्या नावाखाली प्रवाशांची अक्षरश: लूट सुरू आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या स्पेशल ट्रेन प्रत्येक स्टेशनवर थांबवाव्यात किंवा पॅसेंजर सुरू करून प्रवाशांना दिलासा द्यावा.

- श्रीनिवास सुंचूवार

झेडआरयूसीसी सदस्य, मध्य रेल्वे