शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार यांना 'दादा'गिरी अंगलट; आधी फोनवरून झापलं, नंतर दिलं स्पष्टीकरण
2
Mumbai: १४ पाकिस्तानी ४०० किलो आरडीएक्ससह देशात घुसले
3
बाप्पाच्या निरोपाला वरुणराजाही, विसर्जन निर्विघ्न पार पाडण्यासाठी पालिका, पोलिसांकडून नियोजन
4
ganesh visarjan 2025: बाप्पाच्या निरोपाचे एआयद्वारे ट्रॅकिंग, ड्रोनने सूचना; २५ हजार पोलिस सज्ज
5
महापालिकेची पूर्वतयारी परीपूर्ण, राज्य निवडणूक आयुक्त आढाव्यानंतर समाधानी
6
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
7
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
8
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
9
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
10
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
11
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
12
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
13
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
14
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
15
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
16
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
17
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
18
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
19
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
20
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...

अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या दिवसेंदिवस परमोच्च बिंंदूकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:28 IST

कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी दररोज चार हजारपेक्षा जास्त आरटीपीसीआर व अ‍ँटिजेन चाचण्या केल्या जात आहेत. कोविड १९ व्हायरस व्यक्तीपरत्वे ...

कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी दररोज चार हजारपेक्षा जास्त आरटीपीसीआर व अ‍ँटिजेन चाचण्या केल्या जात आहेत. कोविड १९ व्हायरस व्यक्तीपरत्वे वेगवेगळ्या प्रकारे प्रभावित करतो. बऱ्याच संक्रमित व्यक्तींमध्ये सौम्य ते मध्यम लक्षणे दिसून येतात. अशा व्यक्तींनीही डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केली पाहिजे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे. त्यामुळे नागरिक सावध झाले. ताप, कोरडा खोकला, थकवा, कमी सामान्य लक्षणात ठणका व वेदना होणे, घसा खवखवणे चव किंवा गंध न कळणे आदी लक्षणे जाणवल्यास चाचणी करून घेणाऱ्यांची संख्या वाढली. आरटीपीसीआर व अ‍ँटिजेन चाचणी करण्यासाठी केंद्रासमोर लांबवर रांगा दिसून येत आहेत. वृद्ध नागरिकांना तर गर्दीमुळे दोन-तीन दिवस वाट पाहावी लागत आहे. मात्र, नागरिक आता स्वत:हून कोविड चाचणी करण्यास तयार होत आहेत. त्यामुळे चाचण्यांची संख्या वाढून रूग्णांचा ग्राफही आरोग्य विभाग व नागरिकांची झोप उडविणारा ठरला आहे.

आरोग्यमंत्र्यांकडून अंदाज अहवाल उघड

मार्च महिन्यात आरोग्य विभागाने २ मे २०२१ पर्यंत जिल्ह्यात पॉझिटिव्ह म्हणजे सक्रिय रूग्णांची संख्या किती असू शकते, याची माहिती राज्य आरोग्य विभागाकडे पाठविली होती. या माहितीनुसार, २ मे २०२१ पर्यंत अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या सुमारे २० हजार ८७० पर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तविला होता. या अंदाजानुसारच आयसोलेशन ऑक्सिजन, आयसीयु व व्हेंटिलेटर्स खाटांची किती गरज लागणार आहे, याचेही सादरीकरण केले होते. मंगळवारी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जिल्हानिहाय अंदाज अहवालाबाबत पत्रकारांना माहिती दिली. हा अहवाल बीबीसीवरही जाहीर झाला आहे.

पाच हजार चाचण्यांचा अहवाल ‘वेटिंग’वर

जिल्ह्यात २३ एप्रिलपर्यंत झालेल्या चार हजार आरटीपीसीआर चाचण्यांचा अहवाल जाहीर झाला नाही. शिवाय, ५ हजार ५११ अहवाल प्रतीक्षेत आहेत. कोरोनाचा दैनिक पॉझिटिव्ह रेट कमी होता. सध्याचा प्रगतीपर रेट १४.० वर पोहोचला. त्यामुळे अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

१९ ते ४० वयोगटातील पुन्हा वाढले

जिल्ह्यातील कोरोना रूग्णांमध्ये १९ ते ४० वयोगटात आता झपाट्याने रूग्णवाढ होत आहे. यात आतापर्यंत २१ हजार १३३ बाधित झाले. ० ते ५ वयोगटात ६६१, ६ ते २८ वयोगटात ४ हजार १६०, ४१ ते ६० वयोगटात १६ हजार ६५७ तर ६१ वर्षांवरील ५ हजार ३७२ जण बाधित झाले आहेत. शुक्रवारपर्यंत एकूण पॉझिटिव्ह ४७ हजार ५८३ झाली आहे.

लक्षणनिहाय कोविड रूग्ण (२३ एप्रिलपर्यंत)

लक्षणे नसलेले ८३३

मध्यम - ७०५

सौम्य -५१७

गंभीर - १६४

ऑक्सिजनवर - ३२७

व्हेंटिलेटरवर -४१

आयसीयुमध्ये -१८६

..................

एकूण सर्व बेडस् फुल्ल (२३ एप्रिलपर्यंत)

जनरल ३६३

ऑक्सिजन ७३५

आययीयु १९०

व्हेंटिलेटर्स ८८

२ मे पर्यंत प्रशासनाचा बेडचा अंदाज

जनरल ४५९

ऑक्सिजन १८९८

आययीयु ४३२

व्हेंटिलेटर्स ६६