शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

नाभिक व्यावसायिक सापडले लॉकडाऊनच्या कात्रीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सावरगाव : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्र शासन तथा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार २५ दिवसांचे लॉकडाऊन घोषित करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सावरगाव : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्र शासन तथा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार २५ दिवसांचे लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. यामध्ये सर्वप्रथम नाभिक समाजावर शासनाचे जास्त लक्ष असल्याने लॉकडाऊनच्या काळात नाभिक व्यावसायिक नेहमीच कात्रीत सापडत आलेला आहे. मात्र, त्यांच्या उदरनिर्वाहाचा कुठलाही वाटा शासनाने अजूनपर्यंत उचललेला नाही.

मागील वर्षी कोरोना महामारीच्या काळात अत्यंत अडचणीत सापडलेला व व्यावसायिक फटका बसलेल्या वर्गात नाभिक व्यावसायिकांचा समावेश होता. मागील वर्षभराच्या काळात नाभिक व्यावसायिकांनी जवळपास ५ ते ७ महिने कडकडीत लॉकडाऊन पाळला आणि जेव्हा अनलॉक करण्यात आले तेव्हा ग्राहकांनी पाठ फिरवली होती; परंतु आता कुठे व्यवसाय पूर्वपदावर येत असताना पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लॉकडाऊन पाळताना नाभिक समाजाची वाताहात होऊ लागली आहे. मुळातच नाभिक समाजाचे हातावर पोट असल्याने लॉकडाऊन काळात आता जगायचे कसे, असा गंभीर प्रश्न नाभिक व्यावसायिकांपुढे निर्माण झाला आहे. पूर्वीपासूनच नाभिक समाजातील सलून व्यावसायिकांकडे वडिलोपार्जित कुठलीही जमीन नसल्याने हा समाज बलुतेदार पद्धतीचा एक भाग होता. मात्र, जसजसा बदल होत गेला तसतसा नाभिक समाजानेसुद्धा आपल्या व्यवसायात बदल करून नवा साज चढवला. मार्केटमध्ये एखादी खोली भाड्याने घेऊन या समाजाने आपल्या व्यवसायात नवनवीन उपकरणे आणून जवळपास सर्व सुविधा उपलब्ध केल्या. यामुळे उत्पन्नात भर पडू लागली. एका सलूनमध्ये ४ ते ८ लोक (कारागीर) आनंदाने व्यवसाय करू लागले. मात्र, कोरोना नावाच्या राक्षसाने सर्व हिरावून नेले. आजही या व्यवसायासाठी भरलेली डिपॉझिट, बेरोजगार झालेले कारागीर, घरमालकांचे भाडे, वीजबिल आणि इतर समस्या व उदरनिर्वाहासाठी लागणारा दररोजचा खर्च कसा पेलायचा, असा प्रश्न आजघडीला नाभिक व्यावसायिकांसमोर आहे. या लॉकडाऊनच्या काळात शासनाने नाभिक समाजातील व्यावसायिकांना कमीत कमी दरमहा दहा हजार रुपये अनुदान देऊन त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी नाभिक समाजातील समस्त व्यावसायिकांनी केली आहे.