शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

नियमांना डावलून न.प. स्वीकृत सदस्यत्व

By admin | Updated: December 8, 2014 22:32 IST

बल्लारपूर नगर परिषदेच्या २०११ च्या निवडणुकीत स्विकृत सदस्य पदाची निवडणूक झाली. या निवडणूकीत निवडीसाठी लागणाऱ्या पात्रता नियमांना नगरसेवक राजु झोडे यांनी बगल देत सदस्यत्त्व

कोठारी : बल्लारपूर नगर परिषदेच्या २०११ च्या निवडणुकीत स्विकृत सदस्य पदाची निवडणूक झाली. या निवडणूकीत निवडीसाठी लागणाऱ्या पात्रता नियमांना नगरसेवक राजु झोडे यांनी बगल देत सदस्यत्त्व मिळवल्याचा आरोप बहुजन समाज पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड. राजेश सिंग यांनी बल्लारपुरात आयोजित पत्रकार परिषदेत केला.अ‍ॅड. राजेश सिंग यांनी सांगितले, २०११ ला बल्लारपूर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. स्विकृत सदस्यांच्या निवडीसाठी तिघांनी अर्ज दाखल केला. या निवडणुकीसाठी इंजीनियर, एम.बी. बी.एस. डॉक्टर, प्राचार्य, वकील किंवा कोणत्याही रजिस्टर संस्थेचा पदाधिकारी असणे आवश्यक आहे. मात्र राजु झोडे यांनी धम्म शासन सोसायटी, बल्लारपूर या संस्थेचा सहसचिव असल्याचे प्रमाणपत्र संस्थेचे अध्यक्ष श्रद्धेय भिक्खु सुमनवण्णे स्थवीर यांच्याकडून प्राप्त केले. परंतु, माहिती अधिकाराखाली प्राप्त माहितीवरुन सार्वजनिक विश्वस्थ संस्था नोंदणी कार्यालयाकडून राजु झोडे यांच्याकडे संस्थेचे कोणतेही पद नसल्याचे माहिती दिली आहे, असे त्यांनी सांगितले.बल्लारपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनीही निवडणुकीदरम्यान प्राप्त प्रमाणपत्राची शहानिशा न करता राजु झोडे यांची सदस्यपदी निवड केली. ही बाब शासनाची दिशाभूल करणारी असून गंभीर स्वरूपाची आहे. याबाबत पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे तक्रार १ डिसेंबरला दाखल केली. मात्र पोलिसांनी केवळ चौकशीचा फार्स पुढे करून कारवाई करण्यास धजावत आहेत. राजु झोडे यांना पोलीस संरक्षण देत असल्याचा आरोप सिंग यांनी यावेळी केला. नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडेही तक्रार दाखल करून सदस्यत्त्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. यापूर्वी अशाच प्रकारची घटना याच नगरपरिषदेत घडली असता ‘त्या’ प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली व सदस्यत्त्व रद्द केले. मात्र, आता कारवाई करण्यास विलंब का केला जात आहे, असेही सिंग म्हणाले. बल्लारपूर पोलिसांची भूमिका या प्रकरणात संशयास्पद असून केवळ चौकशी करीत असल्याचा देखावा करीत आहेत. राजु झोडे यांच्यावर कारवाई करण्यासाठी आवश्यक सर्व दस्ताऐवज पोलिसांना सुपूर्द करण्यात आले आहेत. तरीही कारवाई का करण्यात येत नाही, असा प्रश्न त्यांनी केला आहे. पोलीस ठोस भूमिका घेत कारवाई करीत नसल्याने न्यायालयात दाद मागणार असल्याचे अ‍ॅड. सिंग यांनी यावेळी म्हटले.जिल्हा प्रशासनाच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे. (वार्ताहर)