शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

आता शिक्षक भरती होणार समितीमार्फत

By admin | Updated: September 9, 2014 23:22 IST

शिक्षण हा व्यवसाय असून शिक्षण संस्था या व्यापारी प्रतिष्ठाने बनल्याचे सर्वज्ञात आहे. हा व्यवसाय फोफावण्याला सरकारी यंत्रणाही काही प्रमाणात जबाबदार असल्याचे निदर्शनास येऊ लागल्याने शिक्षण

खडसंगी : शिक्षण हा व्यवसाय असून शिक्षण संस्था या व्यापारी प्रतिष्ठाने बनल्याचे सर्वज्ञात आहे. हा व्यवसाय फोफावण्याला सरकारी यंत्रणाही काही प्रमाणात जबाबदार असल्याचे निदर्शनास येऊ लागल्याने शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराला लगाम लावण्यासाठी सरकार विविध पावले उचलित आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा पदभरतीमध्ये शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून होणाऱ्या मनमानीला लगाम लावण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने विभागीय आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. ही समिती शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे.खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये दरवर्षी हजारो शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदभरती करण्यात येते. एक पद भरण्यासाठी संस्थाचालकास उमेदवारांकडून लाखो रुपये मिळतात. त्यामुळे रिक्त जागा भरण्यासाठी संस्थाचालक अनेक मार्गाचा अवलंब करतात. संस्थाचालक कागदावर बनावट पट दाखवून रिक्त पद निर्माण करुन घेतात आणि कर्मचारी भरण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत.रिक्त जागा भरण्यासाठी संस्थांना शिक्षणाधिकाऱ्यांकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते. शिवाय पद भरती केल्यानंतर उमेदवाराला शिक्षण विभागाकडून वैयक्तिक पद मान्यता घ्यावी लागते. यात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार करण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने शासनाने तीन ते पाच आॅक्टोबर २०११ दरम्यान शिक्षण विभागाने राज्यात पट पडताळणी मोहिम राबविली. यामध्ये अनेक शाळात बनावट पट असल्याचे निदर्शनास आले आणि शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातील गोरखधंदा बाहेर आला. त्यामुळे शेकडो शिक्षक अतिरिक्त ठरले. संपूर्ण अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यासाठी राज्य शासनाने शिक्षक आणि शिक्षकेत्तर पद भरतीवर बंदी घातली. संस्थाचालकाचा अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनास विरोध असून ते नवीन पद भरतीची मागणी शासन दरबारी रेटत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याचे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांना दिले. तसेच यापुढे शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीसाठी जिल्हा आणि विभागस्तरावर समित्या स्थापन करुन शिक्षकांची पदभरती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. (वार्ताहर)