शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

गेल्या कर्जमाफीपेक्षा आता लाभार्थी संख्या घटणार

By admin | Updated: June 13, 2017 00:30 IST

जिल्ह्यात १ लाख १७ हजार ३४९ शेतकऱ्यांकडे ७४१ कोटी ४६ लाख ८ हजार रुपयांचे कर्ज आहे.

जिल्हा बँक : ६० हजार अल्पभूधारक थकबाकीदारमिलिंद कीर्ती । लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात १ लाख १७ हजार ३४९ शेतकऱ्यांकडे ७४१ कोटी ४६ लाख ८ हजार रुपयांचे कर्ज आहे. मात्र, शेतकरी नेते व उच्चाधिकार मंत्रिगटाच्या चर्चेमध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांंना तातडीने कर्जमाफी देण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून कर्ज घेतलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या ६० हजार ५४७ आहे. २००८ मध्ये कर्जमाफी मिळालेल्या अल्पभूधारकांपेक्षा यावेळी कर्जमाफीचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये घट होणार आहे. त्यात तब्बल ३१ हजार ३८४ शेतकऱ्यांची घट होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या उच्चाधिकार मंत्रिगटाने चर्चेअंती घेतलेल्या निणर्याचा आदेश निघण्यास वेळ आहे. त्यामध्ये कर्जमाफीचे निकष स्पष्ट केले जातील. अल्पभूधारक शेतकऱ्यांना यावर्षीचेही कर्ज माफे केले जाईल, अथवा नाही, याबाबत स्पष्टता आलेली नाही. ती शासकीय आदेश आल्यानंतर चित्र स्पष्ट होईल. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता असलेल्या लाभार्थी अल्पभूधारक शेतकऱ्यांची माहिती गोळा करणे सुरू केले आहे. जिल्हा बँकेप्रमाणे राष्ट्रीयकृत बँका व ग्रामीण विकास बँकेनेही पीक कर्जाचे वितरण केले आहे. तिन्ही बँकांनी कर्ज वाटप केलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांची अंतिम आकडेवारी तयार करण्यात येत आहे.गेल्या वेळी ९२ हजार लाभार्थीयापूर्वी २००८ मध्ये सरकारने कर्जमाफी दिली होती. त्यावेळी जिल्हा बँकेच्या ९२ हजार ३१ अल्पभूधारक कर्जदार सभासदांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला होता. परंतु गेल्या नऊ वर्षांत कर्ज घेणाऱ्या अल्पभूधारक सभासदांची संख्या कमी झाली आहे. परिणामी नवीन कर्जमाफीचा आदेश आल्यानंतर जिल्हा बँकेच्या ६० हजार ५४७ अल्पभूधारक कर्जदार सभासदांना लाभ मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. लाभार्थी संख्या घटली असली तरी माफीची रक्कम गेल्या वेळीपेक्षा अधिक आहे. २००८ मध्ये सरकारने १५३ कोटी ५३ लाख रुपये माफीचा लाभ दिला होता. तो आता २७२ कोटी ६९ लाख रुपये मिळण्याची शक्यता आहे.