शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

आता मोबाईलवर मिळवा वीज बिलाची माहिती

By admin | Updated: August 18, 2016 00:37 IST

ग्राहकांसोबत सुसंवाद वाढविण्याच्या दृष्टीने महावितरणने मोबाईल अ‍ॅप सुरू केले आहेत.

महावितरण : मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याचे आवाहनचंद्रपूर : ग्राहकांसोबत सुसंवाद वाढविण्याच्या दृष्टीने महावितरणने मोबाईल अ‍ॅप सुरू केले आहेत. यातील ‘महावितरण कर्मचारी मित्र अ‍ॅप’च्या माध्यमातून आता ग्राहकांना खंडित वीजपुरवठा, वीजबिल यासह अन्य माहिती तातडीने मिळणार आहे. ही माहिती महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांस त्यांच्या मोबाईलवर मिळणार आहे. ग्राहकांनी ही नोंदणी त्वरित करावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.आपल्या भागातील रोहित्रात बिघाड झाला असेल किंवा दुरुस्ती कामासाठी वीजपुरवठा खंडित करावयाचा असल्यास त्याबाबत माहिती एसएमएसने महावितरणद्वारे देण्याची सुविधा प्राप्त करण्यासाठी ग्राहकांना महावितरणच्या टोन फ्री क्रमांकावर १८००२३३३४३५, १८००२००३४३५ किंवा १९१२ वर फोन करून नोंदणी करावी लागेल. एसएमएस पाठविल्यावर एमआयडी-एमएसईडी आपले रजिस्ट्रेशन झाल्याबाबत नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर नोंदणी झाल्याचा एसएमएस प्राप्त होईल. हा एसएमएस काहीवेळा उशिरा प्राप्त होत शकतो. परंतु आपले रजिस्ट्रेशन हे झाले असेल. मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्यात शेतकरीही मागे नाहीत. चंद्रपूर मंडळातील एक हजार ४४६ शेतकऱ्यांनी मोबाईल क्रमांक, तर २९ शेतकऱ्यांनी ईमेल-आयडीची नोंदणी केली आहे. मोबाईल अ‍ॅपद्वारे वीज बिल देणे, रिडिंग घेणे अशा सुविधा उपलब्ध आहे, अशी माहिती वीज वितरण कंपनीचे जनसंपर्क अधिकारी आनंद कुमरे यांनी दिली. (शहर प्रतिनिधी)५९ हजार ७४७ ग्राहकांची नोंदणीचंद्रपूर परिमंडळांतील ५९ हजार ७४७ ग्राहकांनी मोबोईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केली आहे. त्यात चंद्रपूर मंडळातील ४७ हजार ५२२ ग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली आहे. यात ३९ हजार ८९३ घरगुती, पाच हजार ४९ वाणिज्यिक, तर ७८३ औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे. ई-मेल-आयडीची नोंदणी ३५२९ घरगुती ग्राहकांनी, २९९ वाणिज्यिक व ९४ औद्योगिक ग्राहकांनी केली आहे. या ग्राहकांना ई-मेलद्वाराही वीजबिल मिळणार आहे.