शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

आता भात लागवडीचेही होणार यांत्रिकीकरण

By admin | Updated: June 15, 2014 23:26 IST

पारंपरिक रोवणी पद्धतीला फाटा देत आता जिल्ह्यातील शेतकरी यांत्रिकीकरणाद्वारे रोवणीचे काम करणार आहे. यासाठी कृषी विभाग शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणार असून हालचालिही सुरु झाल्या आहेत. प्रशिक्षणाचा पहिला

साईनाथ कुचनकार - चंद्रपूरपारंपरिक रोवणी पद्धतीला फाटा देत आता जिल्ह्यातील शेतकरी यांत्रिकीकरणाद्वारे रोवणीचे काम करणार आहे. यासाठी कृषी विभाग शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणार असून हालचालिही सुरु झाल्या आहेत. प्रशिक्षणाचा पहिला टप्पा सावली तालुक्यातून सुरु करण्यात येणार आहे.धान उत्पादक जिल्हा अशी ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी धानाची शेती करतात. मात्र उत्पादन कमी आणि खर्च जास्त अशी स्थिती असल्याने शेतकरी आता शेतीपासून दूर जात आहे. धान उत्पादक जिल्ह्याची ओळख यापूढेही कायम राहावी, शेतकऱ्यांना जास्त प्रमाणात आर्थिक लाभ व्हावा यासाठी शासन तथा प्रशासन प्रयत्नरत आहे. मात्र त्यांचे हे प्रयत्न कधी नैसर्गिक आपत्तीमुळे तर कधी तांत्रिक अडचणीमुळे अपूरे पडत आहे.भात लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. बांद्या बांधणे, चिखल करणे, सोबतच पऱ्हे टाकून ते पऱ्हे दोरीच्या सहाय्याने एका लाईनमध्ये रोवावे लागते. यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मजुरांची गरज असते. यात मजूरी जास्त आणि काम कमी होत असल्याने शेतकऱ्यांना ते परवडण्यासारखे नाही. सोबतच दिवसेंदिवस शेतमजूर मिळणे कठिण होत असल्याने रोवणीच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना शेतमजूर मिळविण्यासाठी धावपळ करावी लागते. आता मात्र पीपीपी-आयएडी या यंत्राच्या सहाय्याने रोवणी करणे शेतकऱ्यांना सोयीचे होणार आहे.सदर यंत्र शेतकऱ्यांना अनुदानावर मिळणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना प्रथम प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचा पहिला टप्पा सावली तालुक्यातून सुरु करण्यात येणार आहे. यामाध्यमातून शेतकऱ्यांना रोवणीचे काम सुलभ होणार आहे.