शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

विधवांना मिळणार आता आॅटोरिक्षा परवाना

By admin | Updated: March 6, 2016 00:35 IST

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या परिवारास चरितार्थ चालविणे कठीण जाते.

चंद्रपूर : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या परिवारास चरितार्थ चालविणे कठीण जाते. अशा परिवारास चरितार्थाचे कायमस्वरुपी साधन उपलब्ध होण्याच्या दृष्टीने विशेष बाब म्हणून अशा शेतकऱ्यांच्या विधवांना आॅटोरिक्षा परवाना वितरित करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे निराधार स्वावलंबन योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आॅटोरिक्षा खरेदी करण्यासाठी अशा विधवा महिलांना बँका व वित्तीय संस्थांकडून १०० टक्के कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे.राज्यातील दुष्काळी परिस्थिती, अवकाळी पाऊस, गारपीट, कर्जबाजारीपणा व कर्जफेडीचा तगादा या कारणांमुळे झालेल्या शेतकरी आत्महत्याप्रकरणी त्या कुटुंबाला शासनाकडून तातडीची मदत म्हणून एक लाख रुपये एवढे सानुग्रह अनुदान देण्यात येते. त्याचबरोबर शासनाने जुलै २०१५ पासून विशेष मदतीचा कार्यक्रम विविध विभागांमार्फत राबविण्यास सुरुवात केली आहे. तरीही आत्महत्याग्रस्त कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यामुळे अशा परिवारास चरितार्थ चालविणे कठीण जात असल्याचे शासनाच्या लक्षात आले. त्यामुळे अशा कुटुंबांना कायमस्वरुपी रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी ही योजना शासनाने लागू केली आहे.सद्यस्थितीत राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, सोलापूर, नाशिक व औरंगाबाद या शहरांमध्ये नवीन आॅटोरिक्षा परवाने जारी करण्यावर निर्बंध घातलेले आहेत. मात्र आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींच्या बाबतीत सदर निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या आत्महत्याग्रस्त कुटुंबास शासनाने तातडीची मदत पुरविण्यासाठी पात्र कुटुंब घोषित केले आहे. अशाच महिला या योजनेंतर्गत आॅटोरिक्षा परवाना मिळण्यास पात्र ठरणार आहेत. (शहर प्रतिनिधी)