शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले
3
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
4
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
5
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
6
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
7
दिवसभर लोळावंसं वाटणं तुमच्यासाठी घातक, तो आहे एक आजार; काय आहेत लक्षणे?
8
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
9
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
10
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
11
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
12
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
13
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
14
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
15
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
16
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
17
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
18
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
19
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
20
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?

निवडणूक अधिकाऱ्यांची आठ उमेदवारांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 22:31 IST

लोकसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या ८ उमेदवारांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी मंगळवारी नोटीस बजावली आहे.

ठळक मुद्देनिवडणुकीचा खर्च सादरच केला नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लोकसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या ८ उमेदवारांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी मंगळवारी नोटीस बजावली आहे.जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार सुशील सेगोजी वासनिक, नामदेव माणिकराव शेडमाके, मधुकर विठ्ठल निस्ताने, अशोकराव तानबाजी घोडमारे, नामदेव केशव किनाके, विद्यासागर कालिदास कासलार्वार आदी सहा उमेदवारांनी लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ अंतर्गत निवडणूक खर्चाचे सनियंत्रण सुकर करण्यासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यापूर्वी एक दिवसाच्या आत बँक खाते उघडले नव्हते. बँकेचे खाते क्रमांक उमेदवार नामनिर्देशन दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी कळविण्याची तरतूद आहे. मात्र, ८ उमेदवारांनी आपल्या नामनिर्देशनपत्रासोबत निवडणूक खचार्साठीचे स्वतंत्र बँक खाते तपशील लेखी स्वरुपात सादर केले नाही. याशिवाय दशरथ पांडुरंग मडावी, राजेंद्र श्रीराम महाडोळे या दोन उमेदवारांनी २० व २२ मार्च २०१९ रोजी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. मात्र २६ मार्चपर्यंत दैनंदिन निवडणूक खर्चाचा तपशिल निवडणूक निर्णय अधिकारी खर्च सनियंत्रण विभागात सादर केला नाही. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार निवडणूक खचार्साठीचा स्वतंत्र बँक खात्याचा तपशील लेखी स्वरूपात व दैनंदिन निवडणूक खर्च तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी या संहितेचे पालन न केल्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली. जे उमेदवार खर्च विषयक लेखे विहित कालावधीत सादर करणार नाहीत. त्यांच्याविरुद्ध लोक प्रतिनिधित्व अधिनियम १९५१ व भारतीय दंड संहिता ८६० मधील कलम १७१ नुसार नोटीस बजावण्यात आली आहे.