शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
9
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
10
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
11
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
12
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
13
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
14
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
15
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
16
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
17
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
18
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
19
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
20
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?

रेशनवर ना, अन्नधान्य ना दिवा लावण्यास रॉकेल

By admin | Updated: January 21, 2016 01:04 IST

रेशन दुकान म्हणजे गोरगरीबांचे हक्काचे दुकान. परंतु अलिकडे या दुकानात केंद्र व राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा ...

सामान्य नागरिक हतबल : रेशनकार्ड बनले केवळ ओळखपत्रराजकुमार चुनारकर खडसंगीरेशन दुकान म्हणजे गोरगरीबांचे हक्काचे दुकान. परंतु अलिकडे या दुकानात केंद्र व राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या धोरणामुळे ४५ हजारांवर उत्पन्न असलेल्या सर्वसामान्य जनतेला स्वस्त दरातील धान्य मिळत नाही. एक सिलिंडर असलेल्या गॅसधारकांना रॉकेलही मिळत नाही. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यास नागरिकांना अंधारात रात्रं काढावी लागत आहे. मागील काही वर्षापासून स्वस्त धान्य दुकानातून काही धान्य बेपत्ता होत गेले. सध्या स्वस्त धान्य दुकानात केवळ गहू, तांदुळ व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबासाठी अर्धा किलो प्रती माणूस साखर व गॅस सिलिंडर नसलेल्यांसाठी माणसी अर्धा लीटर रॉकेल किंवा एका रेशनकार्डवर जास्तीत जास्त चार लिटर रॉकेल मिळते.शासकीय दरातील स्वस्त धान्य दुकानातील धान्य मिळविण्यासाठी ग्रामीण भागातील कुटुंबाचे ४४ हजार व शहरी भागातील कुटुंबासाठी ५४ हजार वार्षिक उत्पन्न ही मर्यादा आहे. या लोकांची प्राधान्य यादी बनवून त्यांना दोन रुपये किलो दराने गहू व तीन रुपये किलो दराने तांदूळ दरमहा दर माणसी दिला जातो. या नागरिकांना शिधापत्रिकेवर कोणतेच धान्य मागील अनेक महिन्यांपासून मिळाले नाही. ते कधी मिळणार हे ठावूक नाही. एक लाखापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या लोकांना त्यांच्या शिधापत्रिकेवर कोणतेच धान्य मिळत नसल्याने त्यांच्या शिधापत्रिका केवळ ओळख दाखविण्यापुरत्याच राहिल्या आहेत. नोकरदारांना सहावा-सातवा वेतन आयोग दिला जातो, तर मग एक लाखाच्या क्रिमीलेअरच्या आतील उत्पन्न असलेल्या सर्वच कुटुंबांना दारिद्र्य रेषेखाली कुटुंबे समजून लाभ दिला जावा, अशी मागणी आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचा देखावा निर्माण करण्यासाठी जागतिक बँकेच्या रेट्याने अनेक कुटुंबांना गॅस सिलिंडरचा वापर करण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले. त्याचप्रमाणे काहीशी गरज म्हणून तर काहींनी प्रतिष्ठा म्हणून गॅस सिलिंडरची जोडणी करून घेतली. मात्र आता गॅस सिलिंडर वापरणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला स्वस्त दरातील मिळणारे रॉकेल बंद करण्यात आले आहे. त्यामुळे वीज गेल्यानंतर या कुटुंबाला अंधारात बसावे लागते. त्यामुळे एपीएलच्या म्हणजेच ४४ हजारावर उत्पन्न असलेल्या कुटुंबांनादेखील धान्य पुरवठा करावा. प्राधान्य यादीतील कुटुंबाच्या धान्यात वाढ करावी आणि किमान एक सिलिंडर असणाऱ्या कुटुंबाला प्रति शिधापत्रिकेवर सरसकट दोन लिटर रॉकेल द्यावे, अशी मागणी आहे.