शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेविकेचे आरोप नैराश्यापोटी- शिल्पा राचलवार

By admin | Updated: April 26, 2016 00:40 IST

चिमूर क्रांतिभूमीत नगरपरिषदेच्या प्रथम महिला नगराध्यक्षपदाचा भार ७ नोव्हेंबर २०१५ रोजी स्वीकारल्यानंतर ...

१० कोटी रुपयांची विकास कामे प्रगतिपथावर : टंचाईग्रस्त प्रभागात टँकरने पाणी पुरवठा सुरुचिमूर: चिमूर क्रांतिभूमीत नगरपरिषदेच्या प्रथम महिला नगराध्यक्षपदाचा भार ७ नोव्हेंबर २०१५ रोजी स्वीकारल्यानंतर अवघ्या पाच ते सहा महिन्यांच्या कालावधीत चिमूर परिसराच्या विकासाचे आव्हान पेलले. आजच्या परिस्थितीत विकास कामे प्रगतिपथावर असताना विरोधी गटाचे नगरसेवक हे नैराश्येतून नगराध्यक्ष व त्यांच्या गटावर बिनबुडाचे आरोप करीत आहे. ते सर्व आरोप धादांत खोटे असून १० कोटी रुपयाचे कामे विविध प्रभागात सुरु असल्याचा दावा नगराध्यक्ष शिल्पा राचलवार यांनी येथे सोमवारी पत्रकार परिषदेत केला.चिमूर शहराचा चेहरामोहरा बदलवून सुंदर शहर बनविण्यासाठी आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकासांची कामे सुरु आहेत. विशेष निधी अंतर्गत ४३ कोटी मंजूर असून पहिला टप्पा ४.३१ कोटी व वैशिष्ट्यपूर्ण निधीअंतर्गत दोन कोटी रुपये मंजूर झाले असून सार्वजनिक बांधकाम उपविभागअंतर्गत कामे सुरु झाली आहेत. १४ व्या वित्त आयोगातून २.३८ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. १.१९ कोटी रुपयांचे धनकचरा व्यवस्थापनासाठी नियोजन करण्यात आले. शहरातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी नगरसेवकांच्या मदतीने प्रत्यक्ष चौकशी करुन झाली असून टंचाईग्रस्त प्रभागात टँकरने पाणी पुरवठा सुरु करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली. प्रभागात १६ मधील तनीस कॉलनीत विहिरीतून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आली. चिमूर शहरासाठी चारगाव येथून पाणी पुरवठा केला जात आहे. पम्प हाऊस बंद असल्याने पाणी पुरवठा बंद होता. त्यामुळे ते पम्प हाऊस सुरु करण्यात आले व पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला.विशेष सहाय्यता निधीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सौंदर्यीकरणासाठी १५ लक्ष रुपये मंजूर झाले असून सौंदर्यीकरणाच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्या हस्ते झाले असून ते काम प्रगतीपथावर आहे. पिण्याच्या पाण्यासह, रस्ते, नाली बांधकामासह स्वच्छता कामे सुरळीत सुरु आहे. विकासासाठी विविध कामे प्रस्तावित केले असून तांत्रिक मंजुरीसाठी व प्रशासकीय मंजुरीसाठी पाठविण्यात आले असल्याच्या त्या म्हणाल्या. त्यात विशेष सहाय्य अनुदानाअंतर्गत शासन दरबारी पाठपुरावा करुन ८.५० कोटी रुपये प्राप्त झाले असले तरी नियोजन करण्यात आले आहे. तांत्रिक व प्रशासकीय मान्यता व निविदा प्रसिद्ध केल्यावर कामाला सुरुवात होईल. या पत्रकार परिषदेला भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. श्याम हटवादे, डॉ. दिलीप शिवरकर, सुनिल किटे, समीर राचलवार, विनोद अढाल, यशवंत वाघे, नगर परिषद उपाध्यक्ष तुषार शिंदे, नगरसेवक उषा हिवरकर, नितीन कटारे, छाया कंचर्लावार, भारती गोडे, उपस्थित होते. (लोकमत चमू)