लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: जिल्ह्यातल्या गडबोरी गावातील बालकाची शिकार करणाऱ्या बिबट्याला पकडण्यात बुधवारी रात्री ११ च्या सुमारास वनविभागाला अखेर यश आले. काही दिवसांपूर्वी या बिबट्याने घरात शिरून आपल्या आईजवळ झोपलेल्या एका नऊ महिन्याच्या बालकाला उचलून नेले होते व त्याची शिकार केली होती.क्षेत्र सहाय्यक बुले, वनरक्षक वैद, वनरक्षक राजश्री नागोसे, शेख, पोलीस पाटील एस.पी. अगडे आदींनी ही कारवाई केली. मागील चार दिवसांपासून वनविभाग त्याच्या मागावर होता व गावात गस्तही वाढविली होती. बुधवारी रात्री अखेरीस तो वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अलगद अडकला.काय होती आधीची घटना?सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथील एका घरात घुसून रविवारी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास बिबट्याने स्वराज सचिन गुरनुले या नऊ महिन्याच्या बालकाला झोपेतून उचलून पळविले होते.गडबोरी येथील सचिन गुरनुले यांचे कुटुंब शनिवारी नेहमीप्रमाणे घरी झोपी गेले. स्वराज हा बालक आईजवळ झोपला होता. आई आणि स्वराज गाढ झोपेत असताना पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास विबट तिथे आला. घरात शिरून आईसोबत खाटेवर झोपलेल्या स्वराजला बिबट्याने झोपेतच उचलले. दरम्यान, त्याची आई झोपेतून जागी झाली. तिने आरडाओरड केली व बिबट्याचा काही अंतरापर्यंत पाठलाग केला. परंतु बिबट्या बालकाला घेऊन वेगाने पसार झाला.ही माहिती पहाटेच वनविभाग सिंदेवाही यांना दिली. परंतु वनविभागाचे कर्मचारी गडबोरी येथे सकाळी पोहताच बालकाचा शोध घेण्यास सुरूवात केली. गावकरी, पोलीस विभाग, वनविभाग यांच्या पुढाकारातून परीसर पिंजून काढला. अखेर गुरुनुले यांच्या घरापासून दोन कि. मी. अंतरावर स्वराजचा मृतदेह आढळला होता.
नऊ महिन्याच्या बालकाला पळवणारा बिबट्या अखेर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 10:18 IST
जिल्ह्यातल्या गडबोरी गावातील बालकाची शिकार करणाऱ्या बिबट्याला पकडण्यात बुधवारी रात्री ११ च्या सुमारास वनविभागाला अखेर यश आले.
नऊ महिन्याच्या बालकाला पळवणारा बिबट्या अखेर जेरबंद
ठळक मुद्देवनविभागाच्या प्रयत्नांना आले यश