शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडीत नऊ लाखांचा मुद्देमाल लंपास

By admin | Updated: January 25, 2016 01:25 IST

स्थानिक शास्त्रीनगर परिसरात घरफोडी होऊन चोरट्यांनी नऊ लाख ३० हजारांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेने सामान्य

चंद्रपूर: स्थानिक शास्त्रीनगर परिसरात घरफोडी होऊन चोरट्यांनी नऊ लाख ३० हजारांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेने सामान्य नागरिकांसह पोलीस यंत्रणाही हादरून गेली असून परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या चोरीचा तपास लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. शास्त्रीनगर परिसरातील पारूल किरीट शुक्ला यांच्या घरी ही धाडसी चोरी झाली. त्यांचे पती, मुलगा व सून एका लग्न समारंभासाठी बाहेरगावी गेले होते. शनिवारी पारूल व त्यांचा मुलगा असे दोघेच घरी होते. रात्री पारूल व त्यांचा मुलगा घराच्या वरच्या माळ्यावर झोपून होते. मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी घराच्या खिडकीचे ग्रील तोडून आत प्रवेश केला व घरातील आलमारीत ठेऊन असलेले ४० तोळ्यापेक्षा अधिक सोन्या-चांदीचे दागिने, रोख पाच हजार रुपये व मोटारसायकल असा ९ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पारूल शुक्ला यांनी यासंदर्भात रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)अधिकाऱ्यांची घटनास्थळाला भेट ४अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रल्हाद गिरी, रामनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपत चव्हाण, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील ताजने, बल्लारपुरचे ठाणेदार प्रदीप सिरस्कर यांनी घटनास्थळावर भेट देऊन पाहणी केली. सोबतच रामनगर, शहर पोलीस ठाणे, बल्लारपूर, दुर्गापूर येथील डी.बी.पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेही भेट देऊन पाहणी केली. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या सूचनेवरून रामनगर, चंद्रपूर शहर व दुर्गापूर पोलीस ठाण्यातील डी.बी.पथकही तपासकामी लागले आहे. चोरीतील मोटारसायकल भद्रावतीत सापडली४पारूल शुल्का यांच्या घरासमोर ठेऊन असलेली मोटारसायकही चोरट्यांनी लंपास केली. आज दुपारी सदर मोटारसायकल भद्रावती शहराजवळ रस्त्याच्या कडेला पडून असल्याचे दिसून आले. तिला ताब्यात घेण्यासाठी रामनगर पोलिसांची चमू भद्रावतीकडे सायंकाळी रवाना झाली. डॉग स्कॉड, ठसे तज्ज्ञघटनास्थळावर४घटनेनंतर घटनास्थळावर डॉग स्कॉड दाखल झाले. मात्र काही अंतरापर्यंत माग काढत हे डॉग स्कॉड माघारी फिरले. घटनास्थळावर ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते.