शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

पुरातन वास्तूच्या देखभालीकडे ब्रह्मपुरी पालिकेचे दुर्लक्ष

By admin | Updated: April 4, 2015 00:29 IST

ब्रह्मपुरी शहर हे विद्येचे माहेरघर म्हणून जरी प्रचलित असले तरी या शहरात ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्याकरिता प्राणाची आहुती ...

ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी शहर हे विद्येचे माहेरघर म्हणून जरी प्रचलित असले तरी या शहरात ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्याकरिता प्राणाची आहुती देऊन हौतात्म्य पत्करले ते हुतात्मा गोपाळराव रामचंद्र हर्षे यांच्या स्मरणार्थ हुतात्मा स्मारकाची निमिर्त्ती पालिका प्रशासनातर्फे करण्यात आली. मात्र आज या पुरातन हुतात्मा स्मारकाची दुरवस्था झाली असून न.प. प्रशासन मात्र याकडे सर्रास दुर्लक्ष करीत आहे.पालिका प्रशासनातर्फे हुतात्मा स्मारक येथे वाचनक्षक चालविण्यात येते, मात्र येथे अनेक सोयी सुविधांचा अभाव आहे. स्मारकाच्या छताला छिद्रे पडले असून समोरील भाग तुटलेला आहे. येथील पंखे, लाईट आदी उपकरणे काम करीत नसून वारंवार तक्रार करुनही न.प. प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. तसेच ब्रह्मपुरी नगर परिषदेला जानेवारी २०१५ ला २५ वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त रौप्य महोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला. मात्र येथील पुरातन वास्तू हुतात्मा स्मारकवर विद्युत रोषनाईच्या व्यतिरिक्त स्मारक दुरुस्त करण्याचे सौजन्यही न.प. प्रशासनाने दाखविले नाही. दरवर्षीच्या बजेटमध्ये कोटी रुपये विकास कामाच्या नावाखाली खर्च केले जातात. मात्र या वास्तूला रौप्य महोत्सव वर्षी सुद्धा दुरुस्ती करणार की नाही याचीही चिंता व्यक्त केली जात आहे. याच हुतात्मा स्मारक परिसरातत बगीचा असून त्यावर न.प. प्रशासन जपणूक करीत आहे. पण हुतात्मा स्मारक वाचन कक्षात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रशासनाकडे खर्च करण्यासाठी रकम शिल्लक रुपये नसल्याचे विद्यार्थ्यांच्या वारंवार पुस्तक मागणीवरुन दिसून येत आहे. न.प. प्रशासनाने आवश्यक त्याच बाबीवर खर्च करुन शहराचा सर्वांगीण विकास करावा अशी मागणी नागरिकांची आहेत. (तालुका प्रतिनिधी) रमाबाई आंबेडकर चौकातील वाचनकक्षाची दुरवस्थान.प. प्रशासनातर्फे रमाबाई आंबेडकर चौक येथे दोन लाख रूपये खर्च करुन वाचनकक्ष बांधण्यात आले. मात्र याच वाचन कक्षात बोरी, काट्या तसेच अनेक झाडे वाढत असूून वाचनकक्ष दुर्लक्षीत आहे.