शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ तीनही नदीघाटांवरून नावेचाच प्रवास

By admin | Updated: December 25, 2014 23:29 IST

यवतमाळ जिल्ह्याच्या सीमारेषेवरुन वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरच्या कोरपना तालुक्यातील तीन नदीघाटांवर अद्यापही पुलाचे निर्माण झाले नाही. त्यामुळे नागरिकांना अजूनही नावेच्या सहाय्याने

पुलांच्या निर्मितीकडे दुर्लक्ष : प्रशासन व लोकप्रतिनिधीची उदासीनताचंद्रपूर : यवतमाळ जिल्ह्याच्या सीमारेषेवरुन वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरच्या कोरपना तालुक्यातील तीन नदीघाटांवर अद्यापही पुलाचे निर्माण झाले नाही. त्यामुळे नागरिकांना अजूनही नावेच्या सहाय्याने किंवा पायदळच नदीपात्रातूनच प्रवास करावा लागत आहे. नदीपात्र खोलगट असल्याने हा प्रवास धोक्याचा आहे. मात्र कमी अंतराच्या फेऱ्यामुळे सारे धोके प्रवाशी पत्कारताना दिसून येत आहे. कोरपना तालुक्यातील परसोडा, पारडी, गांधीनगर हे अनुक्रमे तीन नदीघाट आहे. येथून प्रवाशांची नियमित ये- जा सुरू असते. या तिन्ही घाटांवर पूल निर्मिती होण्याची नितांत गरज आहे. हे मार्ग कोरपना व मुकूटबन शहराला जोडणारे कमी अंतराचे असल्याने नियमित रेलचेल असते. शिवाय कोरपना, वणी, झरी (जामणी) व तेलंगणातील बेला मंडल परिसरातील नागरिकांना रहदारीच्या दृष्टीकोनातून अत्यंत सोयीचे आहे. परंतु या नदीघाटावर स्वातंत्र्यानंतर अनेक दशके लोटूनही व वारंवार मागणीे होऊनही पुल निर्मिती होऊ शकली नाही. त्यामुळे या घाटावरुन जीवघेणा प्रवास नागरिकांना करावा लागत आहे. यातील पारडी (खातेरा) नदीघाटावर पुल निर्मितीसाठी शासनातर्फे सत्कारत्मक पावले उचलली गेली. पुलांच्या निर्मिती कार्यालाही मंजुरी देण्यात आली. परंतु राजकीय वरदहस्तापुढे चक्क पुलच पळवून नेण्याचा प्रकार घडला. येथील निर्माणधीन पूल झरी (जामणी) तालुक्यातील दिग्रस येथून तेलंगणामधील जैतन मंडलच्या अनंतपूर नदीघाटाला जोडला गेला. या पुलांची निर्मिती होऊन नियमित रहदारीही सुरू झाली. शासन दरबारी आजपर्यंत या ठिकाणी दुसऱ्या पुलांच्या निर्मितीचा आराखडा अद्यापही तयार केला नसल्याने पुलांच्या निर्मितीचे भवितव्य अंधारीतच आहे. यापूर्वी याच पैनगंगा नदीवर कोडशी (खुर्द), वनोजा येथे पुलांची निर्मिती करण्यात आली. यातील वनोजा पूल पाण्यात वाहून गेल्याने पुन्हा निर्मिती करण्यात आली. परंतु यातील एकाही पुलांचा अनुशेष अद्यापही दूर होऊ शकला नाही. वाहतुकीच्या दृष्टीने कोरपना- वणी, गडचांदूर- वणी मार्ग सुलभ झाले असले तरी, तीन पुलांचा अनुशेष बाकीच आहे. याबरोबरच तेलगंणा- महाराष्ट्राला जोडणाऱ्या दुर्भा- सांगडी, भेदोडा- धानोरा, खोगदूर- हिरापूर या पुलांचाही अनुशेष पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे तेलंगणातील आदिलाबाद व यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांना याच नवनिर्मित दिग्रस पुलाचा एकमेव मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने सोयीचा आहे. परंतु अंतराच्या दृष्टीने हा मार्ग जिल्ह्यातील नागरिकांना परवडणारा नाही.पारडी येथे पुलाची निर्मिती झाल्यास पारडी, रुपापेठ, मेहंदी, अकोला व नदीपलीकडील खातेरा, खडकी, आयलोन, अडेगाव आदी गावासाठी सोयीचे होईल. परसोडा घाटावर केल्यास परसोडा, परसोडा गुडा, कोठोडा, दुर्गाडी, पांडूगुडा, नदीपलीकडील पिंपरड, राजूर, बैलनपूर, हिरापूर, मांगली व तेलगंणातील कोब्बई भागातील गावातील नागरिकांना त्याचा फायदा होईल. गांधीनगर येथे पूल झाल्यास कोडशी (बु.), कोडशी (खु.), हेटी, तुळशी, शिवाजीनगर, गांंधीनगर, जेवरा, नदीपलीकडील तेजापूर, चिखली, देऊरवाडा, आमलोन आदी गावासाठी रहदारी व व्यापारपेठांच्या दृष्टीने सोयीचे होईल. कोरपना व मुकूटबन या शहरातील बाजारपेठेला यामुळे सुगीचे दिवस येऊ शकतात. दोन्ही भागात भाजपाचेच लोकप्रतिनिधी असल्याने नव्या सरकारकडून आता नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहे, हे विशेष. (शहर प्रतिनिधी)