शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

सातबारावरून नावे केली गहाळ

By admin | Updated: July 1, 2015 01:27 IST

नागभीड तालुक्यातील सोनापूर येथील ईश्वर डोमाजी रंदये यांच्या नावे

मोहाळी (नलेश्वर) : नागभीड तालुक्यातील सोनापूर येथील ईश्वर डोमाजी रंदये यांच्या नावे असलेल्या शेतजमिनीच्या सातबारावरून कोणत्याही प्रकारची वाटणी व संमतीपत्र न घेता इतर हिस्सेदारांनी मंडळ अधिकारी व तलाठ्याला हाताशी धरून नावे गायब केली. मंडळ अधिकरी व तलाठ्याच्या या प्रतापाने ईश्वर रंदये या शेतकऱ्याला वडिलोपार्जित व हक्काच्या शेतजमिनीपासून वंचित राहावे लागत आहे. २५ वर्षांपासून तहसील कार्यालयाच्या वाऱ्या करून व पायऱ्या झिजवून ईश्वर रंदये याला अद्यापही न्याय मिळाला नाही. सोनापूर प.ह.नं. १८ गोविंदपूर येथील जुना गट नं. १४८/१ आराजी ५.६७ हेक्टर आर. भोगवट वर्ग २ ची धानारी शेतजमीन अन्यायग्रस्त शेतकरी ईश्वर डोमाजी रंदये व इतर हिस्सेदार कैलाश नामदेव रंदये, विलास नामदेव रंदये व विठोबा रामदास रंदये या सर्वांची वडिलोपार्जित शेतजमीन आहे. २५ वर्षापूर्वी इतर हिस्सेदारांनी मंडळ अधिकारी व तलाठ्याला हाताशी धरून ईश्वर रंदये यांचे नाव सातबारावरून केले. वास्तविक नविन सातबारा फेरफार करताना संबंधित हिस्सेदाराचे संमतीपत्र व वाटणीपत्र आवश्यक आहे. असे असताना ईतर हिस्सेदारांनी २५ वर्षापूर्वी मंडळ अधिकारी व तलाठ्याला हाताशी धरून हा गैरव्यवहार केला.मंडळ अधिकारी व तलाठ्याच्या या प्रतापाने ेईश्वर रंदये या शेतकऱ्याला आपल्या हक्काच्या साडेतीन एकर शेतजमिनीपासून वंचित राहावे लागत आहे. ही शेतजमीन मिळावी म्हणून हा अन्यायग्रस्त शेतकरी २५ वर्षांपासून सातत्याने तहसील कार्यालयाच्या वाऱ्या करून व पायऱ्या झिजवूनही त्याला न्याय मिळत नाही. न्याय मिळावा व हक्काची शेतजमीन मिळावी म्हणून त्याचा संघर्ष सुरूच आहे. (वार्ताहर)सर्व नियम धाब्यावरसातबारावरील नाव कमी करण्यासाठी व फेरफार करण्यासाठी वारसांंकडून किंवा संबंधितांकडून संमतीपत्र मिळत नाही, तोपर्यंत महसूल विभागाला सातबारावरून कोणाचेही नावे कमी करण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. सातबारावरून नावे कमी करण्याचा अधिकार मागणीनुसार संबंधिताचे संमतीपत्र किंवा मृत्युपश्चात सरपंचाचे वारसान प्रमाणपत्र, पोलीस पाटलाचे वारसान प्रमाणपत्र, ग्रामपंचायत कार्यालयातील सचिवाची स्वाक्षरी असलेला मृत्यू दाखला व १०० रुपयाच्या शपथपत्रावर वारसा हक्क असल्याचे सिद्ध करावे लागते. यानंतरही महसूल विभागाला त्या संदर्भात कुणाची हरकत किंवा आक्षेप असल्यास मुदतपूर्व जाहीरनामा प्रसिद्ध करावा लागतो. ठरलेल्या मुदतीत कुणाचे आक्षेप किंवा हरकत नसल्यास सातबारावर वारसानाचे नावे चढवून सातबारा फेरफार करण्यात येत असतो. मात्र येथे २५ वर्षापूर्वी मंडळ अधिकारी व तलाठ्याने सर्व नियम धाब्यावर बसवून अन्यायग्रस्त शेतकऱ्याचे नाव गहाळ केल्याचा प्रताप केलेला आहे.शेतजमीन विकलीइतर हिस्सेदार कैलास नामदेव रंदये, विलास नामदेव रंदये, विठोबा सोमा रंदये यांनी अन्यायग्रस्त शेतकरी इश्वर डोमा रंदये यांची शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावरून मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या संगनमताने नाव गायब केली व तीच शेतजमीन नविन गट नं. १४८/२ शंकर गणपत भरडे रा. सोनापूर व नवीन गट नं. १४८/४ राधाबाई विनायक नन्नावरे यांना परस्पर विकून नवीन सातबारा तयार केल्याचा आरोप अन्यायग्रस्त शेतकरी ईश्वर रंदये यांनी केला असून जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन या प्रकरणाची पूर्णत: चौकशी करून न्याय देण्याची मागणी केलेली आहे.