शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

नागभीड नगर पालिकेत भाजपला बहुमत

By admin | Updated: May 27, 2017 00:33 IST

येथील नगर परिषदेच्या १७ जागांसाठी बुधवारी घेण्यात आलेल्या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला.

नगराध्यक्षपदी भाजपाचे उमाजी हिरे : काँग्रेसला सात जागालोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : येथील नगर परिषदेच्या १७ जागांसाठी बुधवारी घेण्यात आलेल्या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. या ठिकाणी नगराध्यक्षासह भाजपने १७ पैकी नऊ जागा जिंकून एक हाती सत्ता हस्तगत केली आहे. काँग्रेसने सात जागा मिळविल्या तर एक जागा अपक्षाने जिंकली. नगराध्यक्षपदी भाजपाचे प्रा.डॉ. उमाजी हिरे निवडून आले. त्यांनी काँग्रेसचे विनायक रंधये यांचा पराभव केला. नागभीड नगर परिषदेची ही पहिलीच निवडणूक असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे या निवडणुकीकडे लक्ष लागले होते. मागील वर्षी ११ एप्रिल रोजी चिमूरचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी नागभीडला नगर परिषदेचा दर्जा मिळवून दिला होता. त्यामुळे ही निवडणक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. पण काँग्रेसनेही त्यांच्यासमोर मोठे आवाहन निर्माण केले होते. यात आ. भांगडिया विजयी ठरले. प्रभाग क्र. १ मधून काँग्रेसचे दिनेश गावंडे यांनी भाजपच्या नरेंद्र हेमणे यांचा ४२७ मतांनी पराभव केला. गावंडे यांना १०४२ तर हेमणे यांना ६१५ मते मिळाली. महिला प्रवर्गातून भाजपच्या काजल कोसे यांनी काँग्रेसच्या संगीता शेंडे यांच्यावर ७३ मतांनी मात केली. कोसे यांना ८४० तर शेंडे यांना ७६७ मते मिळाली. प्रभाग क्र. २ मधून भाजपाचे दोन्ही उमेदवार विजयी झाले. गट अ मधून भाजपच्या गौतम राऊत यांनी अपक्ष अमित संदोकरचा १०० मतांनी पराभव केला. राऊत यांना ६१८ तर संदोकर यांना ५१८ मते मिळाली. ब गटात भाजपच्या मरकाम विजयी झाल्या. मरकाम यांना ११९० तर काँग्रेसच्या श्यामल जिवतोडे यांना ६६६ मते मिळाली.प्रभाग क्र. ३ मधील भाजपचे रूपेश गायकवाड यांनी अपक्ष मंगेश रंधये यांच्यावर ८५ मतांनी मात केली. गायकवाड यांना ६३८ तर रंधये यांना ५५३ मते मिळाली. या प्रभागातील ब गटात काँग्रेसच्या आशा गायकवाड यांनी भाजपच्या अर्चना देवारी यांचा ३७ मतांनी पराभव केला. आशा गायकवाड यांना ८०४ तर देवारी यांना ७६७ मते मिळाली. प्रभाग क्र. ४ मधून काँग्रेसचे दोन्ही उमेदवार विजयी झाले. अ गटातून सारिका धारणे यांनी अपक्ष पुष्पा चौके यांचा ५० मतांनी पराभव केला. धारणे यांना ५१० तर चौके ४६० मते मिळाली. ब गटात काँग्रेसच्या शिरीष वानखेडे यांनी भाजपच्या राजेश मेश्राम ६२ मतांनी पराभव केला. वानखेडे यांना ४२० तर मेश्राम यांना ३५८ मते मिळाली.प्रभाग क्र. ५ मधून एक जागा काँग्रेसला व एक जागा भाजपला मिळाली. अ गटात काँग्रेसचे संजय अमृतवार यांनी भाजपच्या प्रदीप तर्वेकर यांचा २०५ मतांनी पराभव केला. अमृतकर यांना ५४८ तर तर्वेकर यांना ३४३ मते मिळाली. ब गटात भाजपच्या प्रगती धकाते यांनी काँग्रेसच्या सुनीता डोईजड यांना नमविले. धकाते यांना ५८७ तर डोईजड यांना ५२७ मते मिळाली.प्रभाग क्र. ६ मधून दोन्ही जागा भाजपच्या कोट्यात गेल्या. अ गटात भाजपच्या दुर्गा चिलबुुले यांनी काँग्रेसच्या रेखा जगनाडे यांचा ३५८ मतांनी पराभव केला. चिलबुले यांना ८१४ तर जगनाडे यांना ४५६ मते मिळाली. ब गटात भाजपचे गणेश तर्वेकर यांनी अपक्ष जहांगीर कुरेशी यांचा ७०१ मतांनी पराजित केले. तर्वेकर यांना १००३ तर अपक्ष कुरेशी यांना ३०२ मते मिळाली. प्रभाग क्र. ७ मधील अ गटातून भाजपचे दशरथ वुके विजयी झाले. त्यांनी काँग्रेसच्या नंदू खापर्डे यांचा १९ मतांनी पराभव केला. वुके यांना ४९१ तर खापर्डे यांना ४७२ मते मिळाली. ब गटात अपक्ष धनश्री काटेखाये यांनी भाजपच्या अंजली येरणे यांचा ९९ मतांनी पराभव केला. काटेखाये यांना ६२४ तर येरणे ५२५ मते मिळाली. प्रभाग क्र. ८ मध्ये दोन जागा काँग्रेसला तर एक जागा भाजपला मिळाली. अ गटात काँग्रेसच्या सोनाली दांडेकर यांनी रोहिणी गजभे यांचा १२७ मतांनी पराभव केला. दांडेकर यांना १०६५ तर गजभे यांना ९३८ मते मिळाली. ब गटात काँग्रेसच्या सुनंदा माटे यांनी भाजपच्या सीमा कुथे यांचा २६ मतांनी पराभव केला. माटे यांना १०१५ तर कुथे ९८९ मते मिळाली. क गटात भाजपाचे सचिन आकुलवार यांनी काँग्रेसच्या प्रतीक मसीन यांचा अवघ्या पाच मतांनी पराभव केला.निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची मनमानी : सतीश वारजूकरनिवडणूक निर्णय अधिकारी व उपविभागीय अधिकारी उमेश काळे यांनी मतमोजणी दरम्यान काँग्रेस उमेदवारांशी दुजाभाव केला. तसेच फेर मतमोजणीसाठी अर्ज देवूनही घेण्यास नकार दिला, असा आरोप काँग्रेस नेते सतीश वारजूकर यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. येथील प्रभाग क्र. ५ मधील क गटातील उमेदवार प्रतीक भसीन यांचा अवघ्या पाच मतांनी पराभव झाला. भसीन यांनी फेर मतमोजणीचा अर्ज केला असता त्यास नकार देवून सचिन आकुलवार या भाजपाच्या उमेदवारास तत्काळ विजयी घोषित केले. एव्हढेच नाही तर प्रमाणपत्राचे वितरणही केले. अध्यक्षाचे उमेदवार विनायक रंधये यांनाही याबाबत शंका असून त्यांच्याही अर्जाचा विचार केला नाही. निवडणूक निर्णय अधिकारी उमेश काळे यांनी महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम १९६५ च्या कायद्याचा भंग केला असल्याचा आरोपही डॉ.सतीश वारजूकर यांनी यावेळी केला. या पत्रकार परिषदेला तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रफुल्ल खापर्डे, जि.प. सदस्य खोजराम मरस्कोल्हे, पं.स. सभापती रवी देशमुख, विनायक रंधये उपस्थित होते.नगराध्यक्षपदी उमाजी हिरेनागभीडच्या प्रथम नगराध्यक्षपदी भाजपाचे प्रा.डॉ. उमाजी हिरे निवडून आले. त्यांनी काँग्रेसचे विनायक रंधये यांचा ५६७ मतांनी पराभव केला. हिरे यांना ५ हजार २४८ तर रंधये यांना ४ हजार ६८१ मते मिळाली. अपक्ष प्रा.योगेश गोन्नाडे यांनी २००१ मते घेवून तिसऱ्या स्थानावर राहीले.