लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील बाबुपेठ येथील जुनोना चौकात आयोजित लग्नाच्या स्वागत समारंभात नातेवाईकात किरकोळ वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि धारदार शस्त्राने वार करून इसमाचा खून केल्याची घटना सोमवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली. संतोष सिंग टाक (३५) रा. जुनोना चौक असे मृतकाचे नाव आहे.बाबुपेठ येथील टाक परिवारातर्फे लग्नाचा स्वागत समारंभ जुनोना चौक येथे आयोजित करण्यात आला होता. स्वागत समारंभ सुरू असताना जुन्या वैमनस्यातून संतोष सिंग टाक यांचा नातेवाईकासोबत वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने संतोष सिंग यांना मारहाण करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र रागाच्या भरात आठ ते दहा जणांनी धारदार शस्त्र, लाथाबुक्या, लाठीकाठीने संतोषला मारहाण केली. त्यामुळे संतोष सिंग टाक हे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला.संतोष सिंग टाक यांच्या पत्नी रिनाकौर टाक यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी घटनेची नोंद करून भादंवि ३०२, १४७, १४८, १४९ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप कुणालाही अटक केलेली नाही. पुढील तपास रामनगर पोलीस ठाण्याचे एपीआय बानबले करीत आहेत.
चंद्रपुरात लग्नाच्या स्वागत समारंभात धारदार शस्त्राने इसमाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 16:17 IST
शहरातील बाबुपेठ येथील जुनोना चौकात आयोजित लग्नाच्या स्वागत समारंभात नातेवाईकात किरकोळ वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि धारदार शस्त्राने वार करून इसमाचा खून केल्याची घटना सोमवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली.
चंद्रपुरात लग्नाच्या स्वागत समारंभात धारदार शस्त्राने इसमाचा खून
ठळक मुद्देजुनोना चौकातील घटनाकिरकोळ वादाचे पर्यावसन खुनात