शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
4
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
5
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
6
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
9
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
10
"तिला परत त्या असुरक्षित वातावरणात ढकललंच नाही पाहिजे...", हुंडाबळी प्रकरणावर नेहा शितोळे स्पष्टच बोलली
11
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
12
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
13
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
14
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
15
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
16
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
17
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
20
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!

मुडझा, मानोऱ्यात डेंग्यूची साथ

By admin | Updated: June 14, 2014 23:29 IST

बल्लारपूर तालुक्यातील मानोरा येथे एकाचा तर ब्रह्मपुरी तालुक्यातील मुडझा येथे डेंग्यू दोघांचा मृत्यू झाला. यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून अनेक रुग्ण उपचार घेत आहेत.

गांगलवाडी, कोठारी : बल्लारपूर तालुक्यातील मानोरा येथे एकाचा तर ब्रह्मपुरी तालुक्यातील मुडझा येथे डेंग्यू दोघांचा मृत्यू झाला. यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून अनेक रुग्ण उपचार घेत आहेत.मुडझा येथील अजय अशोक राऊत, देविदास मुळे अशी मृतांची नावे आहेत. विलास बांबोळे, बालू बांबोळे, जिजाबाई दिवटे यांच्यावर नागपूर येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर तुकाराम कवडू तोमटी, प्रमोद दादाजी पाल, भारती चिमूरकर, सुषमा मधुकर रोहणकर, प्रभा उरकुडे व अन्य दोघे ब्रह्मपुरी येथील विविध रुग्णालयात दाखल आहेत. मानोरा येथे आजाराने गावात डेंग्यु तापाने थैमान घातले असून एक महिन्याच्या कालावधीत दोघे दगावले आहे. यामुळे नागरिकांत भीती निर्माण झाली आहे. रितेश पिपरे नामक मुलगा चंद्रपूर येथे उपचारादरम्यान दगावला. मागील महिना भरापासून मानोरा, कवडजई, इटोली, आसेगाव आदी गावात डेंग्यु तापाची साथ सुरू आहे. गावात आरोग्य विभागाने वेगवेगळे आरोग्य शिबिर लावून गावकऱ्यांची तपासणी केली. मात्र त्यात डेंग्युचे प्रमाण कमी होते. परंतु तापाची साथ काही प्रमाणात आढळून आली. एक महिन्यापूर्वी ताऊ सातपूते (७०) मानोरा या इसमाचा डेंग्युने मृत्यू झाला. शुक्रवारी रितेश पिपरे नामक मुलास रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीत डेंग्यु सदृश्य ताप असल्याचे आढळून आले. दरम्यान दिनेश दगावला. यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. (वार्ताहर)