शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

कीटकजन्य व जलजन्य आजारांसंबंधी मनपा गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 22:36 IST

पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. पावसाळ्यात विविधप्रकारचे आजार उद्भवतात. अशा कीटकजन्य व जलजन्य आजारांचा सामना करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका गंभीर असून मनपा आरोग्य विभागातर्फे विविध प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

ठळक मुद्देमनपातर्फे जनजागृती अभियान : नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. पावसाळ्यात विविधप्रकारचे आजार उद्भवतात. अशा कीटकजन्य व जलजन्य आजारांचा सामना करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका गंभीर असून मनपा आरोग्य विभागातर्फे विविध प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.पावसाळ्यात शहरी व ग्रामीण भागात कीटकजन्य व जलजन्य साथींचे आजार पसरण्याची दाट शक्यता असते. त्यात मलेरिया, मेंदूज्वर, डेंग्यू डायरिया, डिसेंट्री, गॅस्ट्रोसारख्या रोगांचा समावेश असतो. या रोगांचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे शहरातील विविध भागात जनजागृतीसाठी हँडबिल्स वितरित करण्यात येत आहेत. एमपीडब्लू, एएनएम, व आशा वर्करमार्फत सर्वेक्षणाद्वारे तापाचे रुग्ण शोधणे, रक्त नमुने घेणे व त्यावर औषधोपचार करण्याचे कार्य सुरु आहे. तसेच डासअळीसंबंधी कंटेनर सर्वे करण्यात येत आहे. आवश्यक तेथे अबेट औषधी टाकण्यात येत आहे. एमपीडब्लूमार्फत शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात मलेरिया तपासणी करण्यात येत आहे. बाह्य सेवासत्र दरम्यान कीटकजन्य व जलजन्य आजारासंबंधी आरोग्य शिक्षण देण्यात येत आहे. तसेच मनपा स्वच्छता विभागामार्फत फॉगिंग, स्प्रेर्इंग, नाली सफाई, घंटागाडीमार्फत घरा-घरातील कचरा उचलण्यात येत आहे.महानगरपालिकेच्या प्रयत्नांसोबतच नागरिकांनीही आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यात होणाऱ्या साथीच्या आजारांचा मुकाबला करण्यासाठी नागरिकांनी सामूहिक प्रयत्न करावे, सोसायट्यांतील रहिवाशांनी जमिनीखालील व जमिनीवरील टाक्या स्वच्छ कराव्यात, परिसरात कचरा साचू देऊन नये, पिकलेली फळे खाऊ नयेत तसेच पाणी उकळून व गाळून प्यावे. उघड्यावरील कापलेली फळे, उसाचा रस अशा गोष्टी पावसाळ्यात खाणे टाळावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.डासांची उत्पत्ती टाळण्याचे प्रयत्न करावेकीटकजन्य आजार प्रतिबंधासाठी डासोत्पत्ती होऊ न देणे आवश्यक आहे. यासाठी घरगुती पाण्याचे उघडे साठे जसे हौद, बॅरल, ड्रम, रांजण, माठ, फुलदाण्या, वॉटर कुलर, फ्रिजचा ड्रिप पॅन यामधील पाणी, विहिर, गच्चीवरील पाण्याच्या उघड्या टाक्या, जमिनीतील हौद, बागेतील हौद, टाक्यांच्या गळतीमुळे साचणारे पाणी, गच्चीवर व ड्रेनेज वाहिन्यांमध्ये साठलेले पाणी, घराच्या परिसरातील भंगार सामान, टायर, रिकाम्या बाटल्या, डबे, नारळाच्या करवंट्या, झाडांच्या कुंड्या, झाडांच्या ढोली यात साठणारे पाणी, तुंबलेली गटारे, गावाशेजारील नदी किंवा ओढा यातील साठलेले पाणी, सेफ्टीक टँक, इमारतींचे बेसमेंट येथे डासोत्पत्ती होण्याची शक्यता असते. त्यामुळे या ठिकाणी साचलेले पाणी फेकून एक दिवस कोरडा पाडावा, तसेच स्वच्छ पाणी प्यावे, परिसर स्वच्छ ठेवावे, असे आवाहन करण्यात आले.