शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कन्हारगाव अभयारण्य निर्मितीच्या हालचाली

By admin | Updated: December 10, 2015 01:16 IST

राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या ३६ व्या बैठकीत प्रस्तावित कन्हारगाव अभयारण्य निर्मिती संदर्भात अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात यावी व या समितीने तीन महिन्यात अहवाल सादर करावा,

स्थानिकांचा मात्र विरोध : समिती स्थापन करण्याचे निर्देश सुरेश रंगारी कोठारीराष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या ३६ व्या बैठकीत प्रस्तावित कन्हारगाव अभयारण्य निर्मिती संदर्भात अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात यावी व या समितीने तीन महिन्यात अहवाल सादर करावा, असे निर्देश देण्यात आले. मात्र प्रस्तावित कन्हारगाव अभयारण्य निर्मितीसाठी स्थानिक गावकऱ्यांनी सुरुवातीपासूनच प्रखर विरोध दर्शविला आहे.उत्तर चंद्रपूर प्रदेश, चंद्रपूर अंतर्गत मध्य चांदा वनप्रकल्प विभाग बल्लारशाह क्षेत्राचा अभयारण्य निर्मितीसाठी शासनस्तरावरुन हालचालींना वेग आला आहे. क्षेत्रामध्ये चांदा वनप्रकल्प विभागांतर्गत ३११३४.६३२ हेक्टर क्षेत्र महामंडळाच्या ताब्यात आहे. यामुळे मध्य चांदा विभाग कायमचा बंद करावा लागणार आहे. महामंडळाने १९७० ते २०१५ पर्यंत १७२११.८०४ हेक्टर क्षेत्रात साग रोपवन केलेली आहे. त्याची किंमत अब्जो रुपये आहे. प्रति वर्षी कोट्यवधी रुपयांच्या महसूलाला मुकावे लागणार आहे. यामुळे वनविकास महामंडळाचे मोठे नुकसान होणार असून कार्यरत कर्मचाऱ्यांवर स्थानांतर पदान्वत, नोकरीतून कमी करणे इत्यादी प्रश्न निर्माण होणार आहेत.स्थानिक जनतेचे प्रचंड नुकसानमध्य चांदा वनप्रकल्प विभागाअंतर्गत असलेल्या झरण, कन्हारगाव, तोहोगाव व धाबा परिक्षेत्रातील ४८ गावातील लोक महामंडळाच्या कामावर अवलंबून आहेत. प्रतिवर्ष सरासरी दोन लाख मजूर दिन निर्माण होत असून जंगल परिसरातील जंगल सीमेला लागून असलेल्या गावातील सरासरी दररोज दोन हजार मजूर कामावर असतात. या मजुरांना कामापासून वंचित राहावे लागणार असून कुटुंबाच्या उर्दरनिर्वाहासाठी इतरत्र भटकावे लागणार आहे. त्यांना मजुरीची गंभीर समस्या निर्माण होणार आहे. अशात वने व वन्य प्राणी संवर्धन व संरक्षण योग्य प्रकारे होत असते. अभयारण्य निर्माण करुन शासन काय साध्य करणार आहे, असा सवाल गावकरी करीत आहेत. विदर्भात आधीपासूनच ताडोबा, मेळघाट, पेंच ही राष्ट्रीय उद्याने तसेच बोर, चपराळा, टिपेश्वर गुगामल, सिपान, वान व काटेपूर्णा अभयारण्य पूर्वीपासून अस्तित्वात आहेत. असे असतानाही नागझिरा, कोका, नवीन बोर, मानासिंग देव, उमरेड, कन्हाडा या अभयारण्याची निर्मिती करण्यात आली. मात्र निर्मितीनंतर व्यवस्थापनाकडे पूर्णत: दुर्लक्ष करण्यात आले. तसेच बाधित लोकांच्या मूलभूत समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. वाघाच्या भ्रमणक्षमतेवर निष्कर्ष निघालेला नसताना मेळघाट व अन्य चार अभयारण्यामध्ये वाघाच्या शिकारी याच भागात झाल्या आहेत. वने व वन्यप्राण्यांचे संरक्षण व संवर्धन चांगले होत असताना अभयारण्य निर्माण करुन काय साध्य होणार आहे, असा सवाल चर्चिला जात आहे.(वार्ताहर)