शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या हातात ‘माऊस’

By admin | Updated: December 31, 2015 01:11 IST

तंत्रज्ञानाच्या क्रांतीने जगातील प्रत्येक घटना क्षणात गाव खेड्यापर्यंत पोहचतात.

राजकुमार चुनारकर खडसंगीतंत्रज्ञानाच्या क्रांतीने जगातील प्रत्येक घटना क्षणात गाव खेड्यापर्यंत पोहचतात. त्यातच संगणकीय क्रांती व मोबाईलच्या वापरामुळे गाव-खेड्यातील सामान्य नागरिकही स्मार्ट झाला आहे. शासनाचेही प्रत्येक विभागातील काम संगणकाद्वारे केल्या जात आहेत. त्यामुळे संगणकीय ज्ञान आवश्यक गरज झाली आहे. संगणकीय ज्ञानापासून गावातील विद्यार्थी मागे राहू नये म्हणून चिमूरचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्या पुढारातून चिमूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ५१ शाळांना संगणक संच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे आता चिमूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या हातात ‘माऊस’ येणार आहे. खासगी शाळेच्या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या शाळा विद्यार्थ्यांअभावी ओस पडू लागल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेतील शैक्षणिक दर्जा वाढावा व विद्यार्थ्यांची उपस्थिती टिकून राहावी, याकरिता शासन अनेक योजना राबवित आहे. त्याच दृष्टीने शासन शाळेमध्ये ई-स्कुल, ई-लर्निंग सारखे उपक्रम काही मोजक्या शाळेत राबवित आहे. मात्र माझ्या गाव-खेड्यातील जिल्हा परिषद शाळाही खासगी शाळेच्या तुलनेत मागे राहू नये म्हणून सामाजिक बांधीलकी जोपासत व गुरुजीच्या ऋणांची परतफेड म्हणून शिक्षक दिनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तत: करीत आमदार कीर्तीकुमार भांगडिया वैयक्तिक मिळकतीतून ५१ जिल्हा परिषद शाळांना संगणक संच उपलब्ध करून देणार आहेत. चिमूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १६१ शाळांना संगणक देणे शक्य नसल्याने ५१ शाळांना संगणक देण्याची घोषणा आमदार भांगडिया यांनी केली होती. त्यामुळे १६१ शाळेमधून ५१ शाळांची निवड करण्याकरिता शिक्षकांच्या मदतीने ईश्वर चिठ्ठीद्वारे निवड करण्यात आली आहे. एका शैक्षणिक कार्यक्रमात या ५१ शाळांना संगणक संच देण्यात येणार आहेत. त्यामुळे चिमूर तालुक्यातील ५१ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या हातात ‘माऊस’ येणार आहे.