शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांच्या भाषणासाठी समस्यांचा डोंगर

By admin | Updated: September 6, 2014 01:41 IST

शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले भाषण आणि विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद याचे थेट प्रक्षेपण शाळेतील विद्यार्थ्यांना ऐकवाच असे निर्देश शिक्षण विभागाने दिले.

चंद्रपूर : शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले भाषण आणि विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद याचे थेट प्रक्षेपण शाळेतील विद्यार्थ्यांना ऐकवाच असे निर्देश शिक्षण विभागाने दिले. त्या दृष्टीने काही शाळांना टीव्ही संच बसविला. मात्र अनेक शाळेत टीव्ही संच नसल्यामुळे त्यांना या प्रसंगापासून मुकावे लागले. काही ठिकाणी रेडीओ लावून भाषण ऐकविण्यात आले. मात्र दुर्गम भागातील शाळांमध्ये टीव्ही असूनही दूरदर्शनवर चक्क क्रिकेट सुरू असल्याने विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांचे भाषण शालेय विद्यार्थ्यांना ऐकविण्यासाठी शिक्षकांनी बरीच धावपळ केली. शिक्षण विभागाने कोणत्या शाळेत टीव्ही संच आहेत, याचा आढावाही घेतला. काही शाळांनी टीव्ही संचांची व्यवस्था केली. मात्र बहुतांश शाळा टीव्ही संचाची जुळवाजुळव करू शकल्या नाही. जिल्ह्यातील बहुतांश शाळेत टीव्ही संच नसल्याने गावातील शाळेशेजारी ज्या घरात टीव्ही आहे, अशा घराचा आधार घेऊन कार्यक्रम ऐकवण्याचा प्रयत्न केला. चंद्रपुरातील काही शाळांनी मोठी स्क्रीनची व्यवस्था केली होती. पटांगणात ही स्क्रीन ठेवून पंतप्रधानांचे भाषण ऐकविण्यात आले. काही रेडीओचे कनेक्शन लाऊड स्पिकर जोडून प्रक्षेपण ऐकविण्यात आले. ब्रह्मपुरी तालुक्यात बहुतांश जि.प. शाळेत टीव्ही संच उपलब्ध नाही त्यामुळे अनेकांनी कार्यक्रमच बघितला नाही, असे निर्दशनास आले आहे. ब्रह्मपुरी शहरात खाजगी शाळेत पंतप्रधानाचे भाषण विद्यार्थ्यांना ऐकविण्यात आले. परंतु ग्रामीण भागात पारडगाव, सायगाव, मालडोंगरी, गणेशपूर, अड्याळ, खेळ या गावात टीव्ही संच असल्याने भाषण विद्यार्थ्यांना ऐकविण्याची तयारी करण्यात आली. बल्लारपूर तालुक्यात प्रारंभी, शाळेत प्रोजेक्टर लावण्याचा काहींनी विचार केला. मात्र, ते लावणे अवघड दिसल्यानंतर टीव्हीनेच शाळांनी काम निभावले. सर्व विद्यार्थ्यांसाठी एकच टीव्ही असल्यामुळे किती विद्यार्थ्यांना भाषण नीट ऐकू आले आणि मोदींना नीट बघता आले, हा प्रश्नच आहे. ज्या शाळांमध्ये दोन पाळ्या भरतात, अशा शाळांनी सकाळच्या पाळीतील विद्यार्थ्यांना दुपारी ३ वाजता शाळेत बोलाविले. काही शिक्षकांनी टीव्ही आपल्या घरुन शाळेत आणले. मात्र, केबलचा खर्च शाळांना करावा लागला. हा खर्च अर्थात शिक्षकांनी शेअर करुन उचलला. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसण्याकरिता खास मंडप उभारले. पंतप्रधानानी मोलाचे मार्गदर्शन केले ते आवडल्याची प्रतिक्रिया शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केल्या. या उपक्रमामुळे शिक्षक दिन भरीव वाटला असेही काहींचे म्हणणे पडले. (शहर प्रतिनिधी)