शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

माऊंट एव्‍हरेस्‍टवीर आदिवासी विद्यार्थ्‍यांना नोकरीसाठी शासनाचे लक्ष वेधणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:26 IST

चंद्रपूर : राज्‍यात भाजपाची सत्ता असताना जिवती नगरपंचायत क्षेत्रातील अनेक योजनांसाठी, विविध विकासकामांसाठी निधी उपलब्‍ध केला. या भागातील आदिवासी ...

चंद्रपूर : राज्‍यात भाजपाची सत्ता असताना जिवती नगरपंचायत क्षेत्रातील अनेक योजनांसाठी, विविध विकासकामांसाठी निधी उपलब्‍ध केला. या भागातील आदिवासी आश्रमशाळांतील विद्यार्थ्‍यांनी माऊंट एव्‍हरेस्‍टसारखे उंच शिखर सर करत मिशन शौर्य यशस्‍वी केले. या विद्यार्थ्‍यांना पोलीस विभागात नोकरी देण्‍याचे ठरविले होते. मात्र हे विद्यार्थी अजूनही नोकरीपासून वंचित आहेत. येत्‍या विधानसभा अधिवेशनात या विषयाकडे शासनाचे लक्ष वेधणार आहे, असे प्रतिपादन विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्‍यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी केले.

जिवती येथे भाजपा महिला आघाडीतर्फे मकरसंक्रांतीनिमित्त आयोजित तेजस्विनी महिला जागर संमेलनात ते बोलत होते. मंचावर भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार ॲड. संजय धोटे, सुदर्शन निमकर, भाजपा महिला आघाडी जिल्‍हाध्‍यक्ष अलका आत्राम, माजी महापौर अंजली घोटेकर, विजयालक्ष्मी डोहे, जि.प. सदस्‍य गोदावरी केंद्रे, कमलाबाई राठोड, तालुकाध्‍यक्ष केशव गिरमाजी, सुरेश केंद्रे, तालुका महामंत्री दत्ताजी राठोड, पंचायत समितीचे उपसभापती महेश देवकते यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. १५ ऑगस्‍ट २०२२ ला देशाच्‍या स्‍वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होतील. आजही महिलांवर मोठ्या प्रमाणावर अन्‍याय, अत्‍याचार होत आहेत. महाराष्‍ट्रात या घटनांमध्‍ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नारीशक्‍तीने एकत्र येत अन्‍यायाविरुध्‍द लढा देण्‍याचे आवाहनही यावेळी आ. मुनगंटीवार यांनी केले.