शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य केंद्रात रुग्णांच्या आईनेच केले बाळंतपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 23:20 IST

प्रसूती कळा आल्या. रुग्णवाहिका बोलावली तर चालक नसल्याचे सांगण्यात आले. अखेर गर्भवती महिलेच्या भावानेच दुचाकीवर आरोग्य केंद्रात आणले. मात्र आरोग्य केंद्र डॉक्टर व परिचारिका हजर नव्हते. अखेर गर्भवती महिलेच्या आईलाच आरोग्य केंद्रात बाळंतपण करावे लागले. यात आई व बाळ बचावले. मात्र आरोग्य केंद्रातील कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देडॉक्टर व परिचारिका अनुपस्थित : आई व बाळ थोडक्यात बचावले

लोकमत न्यूज नेटवर्कपाटण : प्रसूती कळा आल्या. रुग्णवाहिका बोलावली तर चालक नसल्याचे सांगण्यात आले. अखेर गर्भवती महिलेच्या भावानेच दुचाकीवर आरोग्य केंद्रात आणले. मात्र आरोग्य केंद्र डॉक्टर व परिचारिका हजर नव्हते. अखेर गर्भवती महिलेच्या आईलाच आरोग्य केंद्रात बाळंतपण करावे लागले. यात आई व बाळ बचावले. मात्र आरोग्य केंद्रातील कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या आदिवासीबहुल जिवती तालुक्यातील जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पाटण येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली. परंतु अधिकारी व कमरचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे आरोग्य केंद्रच आजारी पडले आहे.जिवती तालुक्यातील मौजा चौपनगुडा येथील महिला कमल नारायन राठोड (२३) ही तीन दिवसांपूर्वी पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी आली होती. येथील डॉ. वाढई यांनी तुमची प्रसुती येथे होणार नाही. तुम्ही चंद्रपूरला जा, सिजर करावे लागेल, असे सांगितले. त्यानंतर वडील पैशांची जुळवाजुवळ करीत असताना शनिवारी सायंकाळी ६ वाजता कमलला प्रसुुति कळा आल्याने महिलेल्या भावाने रुग्णवाहिकेसाठी आरोग्य केंद्रात भ्रमनध्वनी लावला. मात्र चालक नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर महिलेचा भाऊ पंढरी मारोती जाधव यांनी आपल्या दुचाकीने तीन किमी पाटण येथील आरोग्य केंद्रात आणले. आरोग्य केंद्रात नर्स व डॉक्टर उपस्थित नसल्याने एकच धावपळ उडाली. अखेर कमलची आई सुशिलाबाई मारोती जाधव यांनीच कसेबसे बाळंतपण केले.बाळाची नाळ एक ते दीड तासानंतर कापण्यात आली. डॉक्टर व नर्स नसल्याने माता व बालकाचे प्राण थोडक्यात बचावले. सदर प्रतिनिधीने महिला डॉक्टर वाढई यांना या प्रकाराबाबत विचारले असता तुम्ही मला प्रश्न विचारु शकत नाही. तुम्ही जिल्हा आरोग्य अधिकारी यांची परवानगी आणा, असे सांगितले. आरोग्य अधिकारी कविता शर्मा यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.पाटण येथील ग्रामपंचायत पेसा अंतर्गत येत असून आरोग्य केंद्राला २० ते २५ गावे जोडली गेली आहे. परंतु पाटण येथील आरोग्य केंद्रात वेळेवर एकही अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे.मला प्रसूती कळा आल्याने माझ्या भावाने मला दुचाकीवर बसवून पाटण येथील आरोग्य केंद्रात आणले. परंतु येथे डॉक्टर व कर्मचारी हजर नसल्याने माझ्या आईनेच माझे बाळंतपण केले.- कमल नारायण राठोड, रुग्ण महिलायापूर्वीही अशा भोंगळ कारभारामुळे अनेक रुग्णांना आपले जीव गमवावे लागले असून बेजवाबदार डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कार्यवाही झालीच पाहिजे.- अंजना भिमराव पवार,पंचायत समिती सदस्य जिवती