शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

मातृसन्मान हाच सर्वोच्च सन्मान

By admin | Updated: January 8, 2015 22:52 IST

हल्ली पुरस्कार कसे मिळविले जातात. हे सर्वविदीतच आहे. मात्र लोकसेवा आणि विकास संस्था पुरस्कारासाठी कुणाचाही अर्ज मागवित नाही. नि:स्वार्थपणे सामाजिक कार्य करणाऱ्यांची संस्था दखल घेवुन

चंद्रपूर : हल्ली पुरस्कार कसे मिळविले जातात. हे सर्वविदीतच आहे. मात्र लोकसेवा आणि विकास संस्था पुरस्कारासाठी कुणाचाही अर्ज मागवित नाही. नि:स्वार्थपणे सामाजिक कार्य करणाऱ्यांची संस्था दखल घेवुन त्यांचा गौरव करते. मातृसन्मान हाच सर्वोच्च सन्मान असून अशा प्रेरणादायी मातृशक्तीच्या मागे संस्था सदैव उभी राहील, असे प्रतिपादन लोकसेवा आणि विकास संस्थेचे अध्यक्ष माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांनी व्यक्त केले आहे. लोकसेवा आणि विकास संस्था चंद्रपूर या संस्थेद्वारा आयोजित मातृगौरव पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. कोसारा मार्गावरील इंस्टिट्युट आॅफ मॅनेजमेंट स्टडीज अ‍ँड रिसर्च येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रात महत्वपूर्ण कार्य करणाऱ्या मातृशक्तीचा गौरव करण्यात आला. शांताराम पोटदुखे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर राखी कंचर्लावार, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे कार्यकारी कुलगुरू डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल, उज्वला कुळकर्णी, सत्कारमूर्ती डॉ. एस. राजलक्ष्मी, प्रा. डॉ. शशी अग्रवाल आणि उषा बुक्कावार यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या सुरूवातीला श्रेया सर्जेकर आणि चमुने शारदास्तवन तथा स्वागतगीत सादर केले. या कार्यक्रमात महापौर राखी कंचर्लावार यांच्या हस्ते यावर्षीच्या सुशिलाबाई दीक्षित स्मृति पुरस्काराने डॉ. एस. राजलक्ष्मी, स्व. यशवंतराव कुळकर्णी स्मृति मातृगौरव पुरस्काराने प्रा. डॉ. शशी अग्रवाल आणि स्व. भावना जयस्वाल स्मृति पुरस्कार उषा बुक्कावार यांचा गौरव करण्यात आला. यावेळी डॉ. एस. राजलक्ष्मी, प्रा. डॉ. शशी अग्रवाल आणि उषा बुक्कावार यांनी सत्काराला उत्तर देताना संस्थेने गौरव केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी दीपक जयस्वाल, डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, महापौर राखी कंचर्लावार, शांताराम पोटदुखे यांनीही विचार व्यक्त केले. संचालन प्रा. डॉ. अल्का तामगडे यांनी तर आभार डॉ. जे.एन. चक्रवर्ती यांनी मानले. (प्रतिनिधी)