शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

आणखी मागितली मुदतवाढ

By admin | Updated: December 6, 2014 22:44 IST

बचतगटांची थकित असलेली रक्कम ६ डिसेंबरपर्यंत जिल्हा परिषदेने द्यावी, असा आदेश न्यायालयाने दिला होता. दरम्यान जिल्हा परिषदेने १५ जानेवारीपर्यंत न्यायालयाकडे मुदतवाढ मागितली आहे.

जिल्हा परिषद : बचत गटांची थकीत रकमेचे प्रकरणचंद्रपूर : बचतगटांची थकित असलेली रक्कम ६ डिसेंबरपर्यंत जिल्हा परिषदेने द्यावी, असा आदेश न्यायालयाने दिला होता. दरम्यान जिल्हा परिषदेने १५ जानेवारीपर्यंत न्यायालयाकडे मुदतवाढ मागितली आहे. त्यामुळे जप्तीची कारवाई काही दिवसासाठी टळली.२००३-०४ मध्ये जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचे गणवेश शिलाईचे कंत्राट चार बचत गटांना देण्यात आले. मात्र या कंत्राटाचे पूर्ण देयक अदा करण्यात आले नाही. त्यामुळे बचत गटांनी न्यायालयात धाव घेतली. चार बचत गटांनी गणवेशची शिलाई करून गणवेश जिल्हा परिषदेला सुपूर्द केले व आपली रक्कम अदा करण्याची मागणी केली. जिल्हा परिषदेने ६ लाख ३१ हजार ३४७ रुपयेच जवळ असल्याने ते बचत गटांना दिले. उर्वरित दोन लाख २८ हजार रुपयांची रक्कम मिळण्यासाठी बचत गटांच्या पदाधिकाऱ्यांनी वारंवार जिल्हा परिषदेकडे तगादा लावला. परंतु २००७ पर्यंत ही रक्कम बचत गटांना मिळाली नाही. त्यानंतर बचत गटांनी चंद्रपूरच्या न्यायालयात धाव घेतली. दरम्यान, न्यायालयाने मागील वर्षी एक आदेश देत जिल्हा परिषदेने बचत गटांना थकित असलेली रक्कम द्यावे, असे सूचविले होते. परंतु बचत गटांना ही रक्कम मिळाली नसल्याने न्यायालयात धाव घेतली व रक्कम मिळण्यासाठी विनंती केली. न्यायालयाने ३ डिसेंबर रोजी जप्तीचे आदेश काढले. त्यानंतर ६ डिसेंबरपर्यंत जिल्हा परिषदेने बचत गटांना थकित असलेले रक्कम अदा करावी, असे निर्देश दिले आहे. दरम्यान आणखी जिल्हा परिषदेने मुदतवाढ मागितली आहे. (शहर प्रतिनिधी)