शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

लाठी परिसरात मुरूम खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 22:17 IST

परसोडी ते सोनापूरपर्यंत १२ किमीचे डांबरीकरण व साईडिंग करण्याचे काम सुरू आहे. साईडिंग करण्यासाठी अवैधरित्या खनन करून मुरूम टाकण्यात येत आहे. महसूल विभागाचे कर्मचारी मात्र याकडे पुर्णत: दुर्लक्ष करीत आहे. पाचगाव व आर्वी येथे वर्गखोलीच्या बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या रेतीकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. ठेकदारांना अभय व गरीब घरकूल लाभार्थ्यांना दंड असा दुजाभाव महसूल कर्मचारी करीत आहेत. परसोडी ते सोनापूर व नवीन पोडसा या रोडवर भरपूर प्रमाणात मुरूम टाकल्या जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कतोहोगाव : परसोडी ते सोनापूरपर्यंत १२ किमीचे डांबरीकरण व साईडिंग करण्याचे काम सुरू आहे. साईडिंग करण्यासाठी अवैधरित्या खनन करून मुरूम टाकण्यात येत आहे. महसूल विभागाचे कर्मचारी मात्र याकडे पुर्णत: दुर्लक्ष करीत आहे.पाचगाव व आर्वी येथे वर्गखोलीच्या बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या रेतीकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. ठेकदारांना अभय व गरीब घरकूल लाभार्थ्यांना दंड असा दुजाभाव महसूल कर्मचारी करीत आहेत. परसोडी ते सोनापूर व नवीन पोडसा या रोडवर भरपूर प्रमाणात मुरूम टाकल्या जात आहे.हा मुरूम वामनपल्ली व सरांडी येथील खदानीतून अवैधरित्या खनन करून टाकण्यात येत आहे. या खदानीवर जेसीबीद्वारे सात आठ फुट खोल खड्डे करून मुरूम काढण्याचे काम सदर ठेकेदार करीत आहे.तोहोगाव येथील सर्व्हे नं. ३८९ टिपू रायपुरे यांच्या शेतातून नाममात्र ब्रास मुरूमाचा परवाना काढून हजारो ब्रास मुरूमाचे खनन केल्याचे दिसते. हाच सर्वे नं. दर्शवून वामनपल्ली व सरांडी येथील मुरूमाचे खनन सुरू असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.अनेक घाटांवरून रेती तस्करीगांगलवाडी : ब्रम्हापुरी तालुक्यातील खरकडा,आवळगाव,हळदा, बोळधा घाटावरून सर्वात जास्त रेतीची चोरी होत असून याच भागात मोठया प्रमाणात रेती तस्कर निर्माण झाले आहेत. केवळ एक-दोन रेती तस्करावर संबंधित विभागाने कारवाई केली आहे. बोडधा घाटावरून रात्रीच्या सुमारास मोठया प्रमाणात रेतीची तस्करी होत असून ही रेती रात्री ट्रॅकद्वारे सिंदेवाहीला नेली जात असल्याची माहिती आहे. तसेच आवळगाव व खरकडा या घाटावरून मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची तस्करी स्थानिक रेती चोरांकडून केली जाते व ही रेती याच भागात सुरु असलेल्या कामांना पुरविल्या जाते. याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.