शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणासंदर्भात ग्रामपंचायतीकडून दिशाभूल

By admin | Updated: September 17, 2015 00:56 IST

येथील वॉर्ड क्रमांक २ मध्ये सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार करण्यात आले. या रस्त्यावर एका इसमाने घरासमोर पक्के बांधकाम करुन अतिक्रमण केले.

घुग्घुस : येथील वॉर्ड क्रमांक २ मध्ये सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार करण्यात आले. या रस्त्यावर एका इसमाने घरासमोर पक्के बांधकाम करुन अतिक्रमण केले. यासंदर्भात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांची दिशाभूल केल्याचा आरोप इबादुल हसन सिद्धीकी यांनी पत्रकार परिषदेत केला.अतिक्रमण हटविण्याची मागणी लोकशाही दिनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. तक्रारीवरून गटविकास अधिकारी यांनी मौका चौकशी करुन अतिक्रमण असल्याचा अहवाल सादर केला आणि ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांना तीन दिवसांच्या आत अतिक्रमण काढून अहवाल सादर करावा, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे निर्देश दिले. मात्र ग्रामपंंचायतीने कारवाई न करता वरिष्ठांची दिशाभूल केल्याचा आरोप इबादुल हसन सिद्धीकी यांनी केला. त्यांनी सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.सिद्दीकी म्हणाले, ग्रामपंचायतीने १९९९-२००० ला विदर्भ विकास वैधानिक महामंडळाच्या निधीतून १२ फुटाच्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे निर्माण केले. तेव्हा अतिक्रमण झालेल्या जागेवर रस्त्याला लागून तक्रारकर्त्यांचे घर होते. ते घर सन १९९४ ला बोंडे नावाच्या इसमास विकले. २००३ मध्ये ते घर सध्या अतिक्रमण असलेल्या मोसीम मैनुद्दीन यांनी २००३ मध्ये घेतले. त्यानंतर त्यांनी २००५ मध्ये लोखंडी एंगलचे शेड बनवून सिमेंट काँक्रीट रस्त्यावर अतिक्रमण केले. तेव्हा केलेल्या तक्रारीवरुन ग्रामपंचायतीने अतिक्रमण हटविले तर परत त्याच रस्त्यावर २०१२ ला लोखंडी शेड उभे केले. तक्रारीवरुन नायब तहसीलदार यांच्या आदेशानुसार अतिक्रमण ग्रामपंचायतीने काढले आणि तसा अहवाल नायब तहसीलदार यांना पाठविला होता. त्या इसमाने परत आपली मनमानी करुन तिसऱ्यांदा त्या रस्त्याला खोदून अतिक्रमण केले. अतिक्रमण हटवून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी सिद्दीकी यांनी केली आहे. (वार्ताहर)