शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
2
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
3
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
4
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
5
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
6
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
7
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
8
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
9
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
10
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
11
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
12
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
13
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
14
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
15
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
16
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
17
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
18
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
19
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
20
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

सिंदेवाही तालुक्यात गौण खनिज चोरी नियंत्रणाबाहेर

By admin | Updated: April 25, 2016 00:43 IST

तालुक्यात गौण खनिजाची चोरी आणि दारूची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

सिंदेवाही : तालुक्यात गौण खनिजाची चोरी आणि दारूची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शासनाचा महसूल बुडत असल्याचे गत एक वर्षाच्या आकडेवारीवरून दिसून येते. तालुक्यात सध्या एक ते दोन रेती घाटांचा लिलाव झाला आहे. त्यामुळे उर्वरीत रेती घाटांवरूनही सर्रास रेती, वाहतूक होत आहे. नवीन तहसीलदार रुजू होवून एक महिन्याचा कालावधी झाला आहे. मात्र अद्याप कारवाई सुरू झालेली नाही. तालुक्यात अनेक ठिकाणी बांधकाम सुरू असून मोठ्या इमारती उभ्या झाल्या आहेत. त्यात वापरण्यात आलेल्या गौण खनिजांच्या रॉयल्टीची चौकशी केल्यास लाखो रुपयांचे गौण खनिज चोरीचे असल्याचे आढळेल. परंतु, स्थानिक आणि वरिष्ठ यंत्रणेतील संबंधिताचे वेळोवेळी या बाबीकडे दुर्लक्ष झाले आहे. कोणत्याही पथकांने ठोस कारवाई कधी केलीच नाही. त्यामुळे अवधै वाहतूक करणाऱ्यांचे चांगलेच फावत आहे. त्यातच राजकीय बळाचा वापर करुन अनेक महाभाग गौण खनिज चोरी करीत आहेत. एक वर्षापूर्वी जिल्हात दारूबंदी झाली. मात्र तालुक्यात दारूबंदी आहे हे अजूनही लोकांना विश्वास बसत नाही. सिंदेवाही तालुक्यात भंडारा, नागपूर, जिल्ह्यातून अवैध दारू पुरवठा होत असून पोलीस विभागातील काही पोलीस कर्मचाऱ्यांचे विक्रेते व पुरवठादारांशी हितसंबंध असल्याची चर्चा आहे. हजारो लिटर दारू पकडली जाते, मात्र अवैध दारूविक्रीवर निर्बंध लावण्यात यश आलेले नाही. (शहर प्रतिनिधी)