शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मिनी मंत्रालयाचा ५३.२३ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 22:58 IST

जिल्हा परिषदेचा सन २०१९-२० या आर्थिक वर्षांचा ५२ कोटी २३ लाख १०० रुपयांचा अर्थसंकल्प अर्थ व बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार यांनी सोमवारी सर्वसाधारण सभेत सादर केला. दरम्यान, सभेत किरकोळ दुरुस्त्या सुचवून या अर्थसंकल्पाला मंजुरी प्रदान करण्यात आल्याची माहिती जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या अर्थसंकल्पात ग्रामीण पाणी पुरवठा विभागासाठी सर्वाधिक १४ कोटी ५० हजार रुपयांची तरतूद केली आहे. यापाठोपाठ पंचायत राज कार्यक्रमांसाठी तब्बल ११ कोटी ७६ लाख ५५ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देग्रामीण पाणी पुरवठा व पंचायत राज कार्यक्रमांसाठी सर्वाधिक तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषदेचा सन २०१९-२० या आर्थिक वर्षांचा ५२ कोटी २३ लाख १०० रुपयांचा अर्थसंकल्प अर्थ व बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार यांनी सोमवारी सर्वसाधारण सभेत सादर केला. दरम्यान, सभेत किरकोळ दुरुस्त्या सुचवून या अर्थसंकल्पाला मंजुरी प्रदान करण्यात आल्याची माहिती जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.या अर्थसंकल्पात ग्रामीण पाणी पुरवठा विभागासाठी सर्वाधिक १४ कोटी ५० हजार रुपयांची तरतूद केली आहे. यापाठोपाठ पंचायत राज कार्यक्रमांसाठी तब्बल ११ कोटी ७६ लाख ५५ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.तसेच सार्वजनिक मालमत्ता परीक्षणासाठी ७ कोटी ७९ लाख ५० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शिक्षण विभागासाठी २ कोटी ६० लाख, बाजार आणि जत्रा २ लाख ५० हजार, सार्वजनिक आरोग्य १ कोटी, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग(२० टक्के रक्कम) १ कोटी ७० लाख, समाज कल्याण विभागासाठी २ कोटी ९० लाख, ५ टक्के अपंग निधी १ कोटी ७५ लाख १०० रुपये, ७ टक्के वन महसूल अनुदान १ कोटी ५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, समाज कल्याण समिती सभापती ब्रिजभुषण पाझारे, कृषी, पशु व दुग्धशाळा समिती सभापती अर्चना जिवतोडे, महिला व बाल कल्याण समिती सभापती गोदावरी केंद्रे व अधिकारी वर्ग उपस्थित होता.पालकमंत्र्यांमुळे ५१७ कोटींची अधिकची विकासकामेचंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे राज्याचे अर्थमंत्री असल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याला गेल्या दोन वर्षांत मोठ्या प्रमाणावर निधी प्राप्त झाला आहे. दोन वर्षांत ५१७ कोटी रुपये प्राप्त झाले असून या निधीच्या दीडपट किमतीची कामे जिल्ह्यातील विविध भागात सुरू असल्याची माहितीही यावेळी जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी दिली.समाज कल्याण व दिव्यांग विभागातील मागील वर्षापर्यंत असलेल्या अनुशेषाची १०० टक्के निधीची तरतूद.पाणी पुरवठा विभागाचा मागील अनुशेषाचा निधी १ कोटी ४२ लाख ७५ हजार रुपये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न.महिला व बाल कल्याण विभागाला त्यांच्या न्याय हक्कापेक्षा ९५ लाख ९२ हजार २०० रुपयांचा निधी उपलब्ध.उत्पन्नवाढीसाठी जि.प.च्या रिकाम्या जागेच्या विकासासाठी आराखडा तयार करणार.