शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

वन मंत्रालयाची निती बिल्ट उद्योगासाठी घातक

By admin | Updated: May 6, 2016 00:59 IST

बिल्ट उद्योगाला जागतिक दर्जा मिळाला आहे. या उद्योगामुळे शहराची भरभराट झाली. मात्र २०१४ मध्ये बांबु पुरवठ्याचा करार वनमंत्रालयाने संपुष्टात आणला.

आंदोलनाचा पाचवा दिवस : बांबुचा पुरवठा थांबविलाबल्लारपूर : बिल्ट उद्योगाला जागतिक दर्जा मिळाला आहे. या उद्योगामुळे शहराची भरभराट झाली. मात्र २०१४ मध्ये बांबु पुरवठ्याचा करार वनमंत्रालयाने संपुष्टात आणला. परिणामी बल्लारपूर पेपर मिलला कच्च्या मालाअभावी अडचण निर्माण झाली आहे. उद्योग सुरू ठेवण्यासाठी बांबु पुरवठा करण्याचा करार करणे क्रमप्राप्त आहे. मात्र वन मंत्रालयाने अडवणुकीचे धोरण आखले आहे. यामुळे उत्पादन क्षमता कमी झाली आहे. यावर तोडगा काढणे गरजेचे आहे. परंतु वन मंत्रालयाची निती बिल्ट उद्योगासाठी घातक ठरणारी असल्याचा आरोप माजी खासदार व कामगार नेते नरेश पुगलिया यांनी केला. यासाठी साखळी उपोषण सुरू असून गुरुवार आंदोलनाचा पाचवा दिवस आहे.बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभा व विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या वतीने स्थानिक नगरपालिका चौकात माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या मार्गदर्शनात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रविवारपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. बुधवारी उपोषणात महिलांनी भाग घेतला. अ‍ॅड. मेघा भाले, अर्चना बुटले, वर्षा दानव, गुरूदीप कौर गिल, छबुताई मेश्राम, शोभादेवी महतो, रोजिदा ताजुदीन, उमादेवी मिश्रा यांचे उपोषण नगराध्यक्ष छाया मडावी, माजी नगराध्यक्ष रजनी मुलचंदानी, सुनंदा आत्राम, माजी नगरसेवक एलिजाबेथ रायबोले यांनी लिंबूपाणी पाजून सोडविले.दरम्यान, गुरुवारी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव राहुल पुगलिया, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गजानन गावंडे, नगरसेवक अशोक नागापुरे, ओबिसी सेलचे अध्यक्ष देवेंद्र बेले, घनश्याम मुलचंदानी, वसंत मांढरे, देवेंद्र आर्य, मजहर अली यांनी सुदर्शन पुल्ली, दिलीप डोंगे, गजेंद्रसिंग, श्रीनिवास उपेंदर व नरेंद्र पडवेकर यांना पुष्पहार अर्पन करून उपोषणावर बसविण्यात आले.बिल्ट उद्योग कच्चा मालाशिवाय चालू शकत नाही. उद्योगाला लागणारा कच्चा माल म्हणून बांबुचा पुरवठा सन २०१४ पर्यंत नियमित केला जात होता. तदनंतर वन मंत्रालयाने निविदा प्रक्रिया केली. या प्रक्रियेला नाममात्र त्रुटी दर्शवून दोनदा रद्द करण्यात आली. यामुळे आजघडीला ९० टक्के कच्चा माल आंध्रप्रदेश, तेलंगाना, तामीलनाडू व अन्य राज्यातुन आयात करावा लागत आहे. परिणामी उद्योगाला मोठ्या खर्चाला सामोरे जावे लागत आहे. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात सहज उपलब्ध होणारा बांबु व लाकडाचा वन मंत्रालयाने जाणिवपूर्वक तुटवडा निर्माण केला आहे. यामुळे येथील उत्पादनावर विपरित परिणाम होत असून कामगारांचे भवितव्य धोक्यात आले आहे. याला कारणीभूत वनमंत्री व वनविभाग असल्याचा आरोप पुगलिया यांनी केला आहे. (शहर प्रतिनिधी)