शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात मंडळस्तरावर मिनी वेधशाळा

By admin | Updated: June 9, 2017 00:55 IST

हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी व त्याअनुषंगाने पीक व्यवस्थापनासाठी जिल्ह्यात प्रत्येक मंडळ स्तरावर

हवामानाची अचूक आकडेवारी मिळणार : थेट पुणे येथून नियंत्रित होणारराजकुमार चुनारकर । लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी व त्याअनुषंगाने पीक व्यवस्थापनासाठी जिल्ह्यात प्रत्येक मंडळ स्तरावर (आर.आय.) स्वयंचलित वेधशाळा उभारण्यात येत आहेत. उपग्रहाद्वारे या वेधशाळेतील माहिती महावेध पुणे या शासनाच्या अधिकृत हवामान केंद्रात संकलित होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात १५ तालुका स्तराअंतर्गत येणाऱ्या मंडळस्तरावर त्यांची उभारणी करण्यात येत आहे.चिमूर तालुक्यात खडसंगी, भिसी, नेरी, शंकरपूर, मासळ, जांभुळघाट, चिमूर याठिकाणी अशा वेधशाळा उभारण्यात येत आहेत. हवामान आधारित फळ पीक तसेच इतर पीक नियोजन करण्याचे धोरण शासनाचे आहे.त्यामुळे नैसर्गिक आपत्तीत होणारे नुकसान टाळणे, तसेच नुकसान झाल्यास त्या भागातील हवामान त्या काळात कसे होते, त्याची माहिती घेणे यासह शेतकऱ्यांना हवामानाची पुर्वसुचना देणे, या उद्देशाने मंडळ स्तरावर वेधशाळा उभारण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. कृषी विभाग त्यासाठी आग्रही असून मंडळस्तरांची त्याकरिता निवड करण्यात आली आहे.मिनी वेधशाळा स्वरूपात असलेल्या या वेधशाळेमध्ये हवेचा वेग, दिशा, वातावरणातील आर्दता, पावसाचे प्रमाण, तापमान यासह इतर बाबींची माहिती संकलित केली जाणार आहे. ही सर्व उपकरणे संगणकाद्वारे उपग्रहाशी जोडली जातील. आॅनलाईन डाटा हा ‘महावेध’ या शासनाच्या अधिकृत केंद्रात संकलित होणार आहे. त्याची माहिती व प्रत जिल्हाधिकाऱ्यांनादेखील मिळणार आहे.सर्वच उपकरणे स्वयंचलितज्याठिकाणी ही उपकरणे बसवली जातील तेथे मनुष्यबळाची कुठलीही गरज राहणार नाही. सर्व उपकरणे ही संगणकीय प्रणालीद्वारे जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे पुणे येथील महावेधच्या कार्यालयातून ती माहिती संकलित केली जाणार आहे. फक्त ज्या भागात हे उपकरणे बसविले जातील, तिथे त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्थानिक ग्रामपंचायतीवर राहणार आहे.विजेची आवश्यकता नाहीहवामानाच्या माहितीसाठी उभारण्यात येणाऱ्या या उपकरणांना विजेची गरज नसल्याचे सांगण्यात येत आहे. कारण उपकरणांना जोडलेल्या सौर बॅटरीद्वारे तेथे उर्जा निर्माण केली जाणार आहे. त्याद्वारेच उपकरणातील डाटा पाठविला जाणार आहे. त्यामुळे दुर्गम भागातदेखील या उपकरणाकरिता विजेविना काही समस्या उद्भवणार नाही.पीक व्यवस्थापनासाठी होणार मदतयापुढे नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासन आता कुठलेही अनुदान देणार नाही. केवळ पीक विम्याद्वारे ती नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यामुळे विमा कंपनीकडून भरपाई योग्य आणि पुरेशी मिळावी, याकरिता या वेधशाळा उपकरणाकडून मिळणाऱ्या अहवालाचाही उपयोग होणार आहे.हवामानाचा अंदाज घेण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या उपकरणामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. हवामानाची पूर्वसूचना देणे, कुठल्या भागात किती पाऊस पडला, हवेचा वेग आणि आर्दता किती राहिली, याची अचुक माहिती याद्वारे मिळणार आहे. कृषी विभागासाठी ते अतिशय महत्त्वाचे आहे.- एम. पी. पवार, तालुका कृषी अधिकारी, चिमूर