शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.ची कोट्यवधींची विकासकामे लागणार मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:34 IST

लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदेतील कोट्यवधींची विकासकामे अडकली होती. गुरूवारी निकाल जाहीर झाला. परिमणामी, प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी तकलादू कारणे पुढे न करता प्रशासनाने जलद गतीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केली.

ठळक मुद्देनिवडणूक आचारसंहिता शिथिल

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदेतील कोट्यवधींची विकासकामे अडकली होती. गुरूवारी निकाल जाहीर झाला. परिमणामी, प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी तकलादू कारणे पुढे न करता प्रशासनाने जलद गतीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केली. आचारसंहिता संपल्यानंतर शुक्रवारी जिल्हा परिषदेत फे रफ टका मारला असता अधिकारी व कर्मचाऱ्यांची लगबग दिसून आली.लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होताच आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे जिल्हा परिषदेतील विविध विभागातील विकासकामांना बे्रक लागला होता. महिला बालकल्याण, बांधकाम, शिक्षण, आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, ग्रामीण पाणी पुरवठा, स्वच्छता व पाणी व्यवस्थापन, समाज कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाºया विविध विकास योजना ठप्प झाल्या होत्या.व्यक्तिगत व सामूहिक कल्याणाच्या योजनांचा निधी खर्च करण्यावर आचारसंहितेमुळे निर्बेंध आले होते. खरीप हंगाम सुरू झाला. परंतु, शेतकऱ्यांच्या विविध योजनांचा निधी रखडला आहे. रासायनिक खते व बियाणे पुरवठ्यासंदर्भात निर्णय आचारसंहितेत अडला होता. यातून मार्ग काढून खते व बियाण्यांची व्यवस्था करण्यात आली.मुख्य म्हणजे, आचारसंहितेच्या कालखंडात पदाधिकाºयांना धोरणात्मक निर्णय घेता आले नाही. विविध विभागप्रमुखांनी विकास योजनांचे प्रस्ताव तयार करून स्वाक्षरीसाठी फायल तयार ठेवल्या आहेत. पंचायत समितीकडून प्राप्त झालेल्या विविध प्रस्तावांवर निर्णय न झाल्याने संबंधित संवर्ग विकास अधिकारी आचारसंहिता शिथिल होण्याची प्रतीक्षा करीत होते.अखर्चित निधीचे काय ?जिल्हा वार्षिक योजना (विभागांच्या एकत्रित योजनांची एकून तरतूद व खर्च) यामध्ये मोठी तफावत असल्याचे वास्तव पुढे आले आहे. ग्रामीण विकास यंत्रणा (६२.२४) आणि कृषी विभागाने (५५.४७) मार्च अखेरपर्यंत निधी खर्च केला. उर्वरित नऊ विभागाने २५ टक्क्यांपेक्षा अधिक निधी खर्च केला नाही. बालकल्याण विभागाने तर केवळ १. ६२ टक्के निधी खर्च केला आहे. या अखर्चित निधीचे काय, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.पाणी टंचाई निवारणाला प्रथम प्राधान्य द्यावेदुष्काळ व पाणी टंचाईसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी निवडणूक आयोगाने आचारसंहितेत शिथिलता आणली होती. परंतु, जि. प. प्रशासकीय यंत्रणा लोकसभा निवडणूक मतदान व मतमोजणी प्रक्रियेत गुंतल्याने प्रभावी उपाययोजना झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पाणी टंचाईची समस्या उग्र स्वरूप धारण करताना दिसत आहे. पदाधिकाºयांनी सर्वात आधी याच प्रश्नाला प्राधान्य दिले पाहिजे.कोट्यवधींची देयके अडलीराज्य व केंद्र शासनाकडून जि. प. मार्फत राबविण्यात येणाºया विविध योजनांची कोट्यवधींची देयके आचारसंहितेमुळे अडली आहेत. ही देयके मंजूर करण्यासाठी प्रशासनाला पाऊल उचलून पुढील कामांचे नियोजनही करावे लागणार आहे. अन्यथा जिल्ह्यातील विकासकामांवर याचा अनिष्ठ परिणाम होऊ शकतो.लाभार्थ्यांची वाढणार गर्दीव्यक्तिगत लाभाच्या योजनांची लाखो रूपयांची देयक प्रलंबित आहेत. लाभार्थ्यांनी यासंदर्भात संबंधित अधिकाºयांना विचारणा केल्यास निवडणूक आचारसंहितेकडे बोट दाखविल्या जात होते. आचारसंहिता शिथिल होताच समस्यांचा निपटारा होईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे ग्रामीण भागातील विविध योजनांचे लाभार्थी जिल्हा परिषदेत गर्दी करणार आहेत.