शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

चंद्रपुरात रोज चघळले जातात लाखोंचे खर्रे

By admin | Updated: January 3, 2016 01:31 IST

ताणतणावात संघर्षरत तरुणपिढी, सततच्या नापिकीमुळे त्रस्त शेतकरी, व्यवसायाचा ताण घेऊन संपूर्ण दिवस घराबाहेर घालविणारे व्यावसायिक, ....

चंद्रपूर: ताणतणावात संघर्षरत तरुणपिढी, सततच्या नापिकीमुळे त्रस्त शेतकरी, व्यवसायाचा ताण घेऊन संपूर्ण दिवस घराबाहेर घालविणारे व्यावसायिक, वाढती बेरोजगारी आणि स्पर्धेच्या युगात आव्हानं पेलणारे नोकरवर्ग झपाट्याने व्यसनाच्या आधीन जात आहेत. सुगंधित तंबाखूवर बंदी असतानाही चंद्रपुरात दररोज लाखोंचा खर्रा फस्त केला जात आहे. सिगारेट, गुटखा व इतर तंबाखूजन्य पदार्थाचा खप वेगळाच. नागरिकांवर पडलेल्या तंबाखूजन्य पदार्थांचा हा विळखा निश्चितच गंभीर आहे.चंद्रपूर शहराची लोकसंख्या सात लाखांच्या घरात पोहचली आहे. यातील ३७ टक्के लोक तंबाखूजन्य पदार्थांच्या आहारी गेले आहेत. धक्कादायक बाब अशी की यातील १५ टक्के सख्या महिलांची आहे. चंद्रपुरातील मुख्य रस्त्यावर व गल्लीबोळात दोन हजारांच्या जवळपास पानटपऱ्या आहेत. यातून नियमित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होते. याशिवाय किराणा दुकानामधूनही हे पदार्थ विकले जातात, अशी माहिती आहे. यातील काही पानटपऱ्यांमधून दररोज २०० ते ३०० खर्रे विकले जात असल्याचे लोकमतच्या पाहणीत आढळून आले. गल्लीबोळातील पानटपऱ्यामधून एका दिवसात एवढ्या खर्ऱ्यांचा खप होत नसला तरी ७५ ते १५० खर्रे तिथूनही विकले जातात. या माहितीवरून सरासरी १०० खर्रे एका पानटपरीमधून दररोज विकले जात आहे. एका खर्ऱ्याची किमत १० ते २० रुपये, याप्रमाणे दोन हजार पानटपरीमधून दररोज लाखोंचा खर्रा खाऊन थुंकला जात आहे. उल्लेखनीय म्हणजे, अगदी १३ वर्षांचे मिसरुड आलेले, न आलेले मुलेही या व्यसनात आकंठ गुरफटले आहेत. चॉकलेट, बिस्कीट व फळे खायच्या वयात ही मुले चक्क खर्रा चघळताना दिसतात. दर एक तासात एक खर्रा फस्त करणाऱ्यांचा हा उपक्रम रात्री उशिरापर्यंत सुरूच असतो. विशेष म्हणजे, शासनाने सुगंधित तंबाखू विक्रीवर बंदी घातली आहे. पोलीस व अन्न-औषध प्रशासन विभागाला कारवाई अधिकारी दिले आहे. असे असले तरी सुगंधित तंबाखू व त्याचे खर्रे सर्रास विकले जात आहे. तक्रार आलीच की एखाददुसरी कारवाई केली जाते. त्यामुळे कर्करोगाचे प्रमाण जैसे थेच आहे. (शहर प्रतिनिधी)आरोग्य धोकादायकवळणावरआधीच औद्योगिकरणामुळे चंद्रपूरचे प्रदूषण देशाच्या पातळीवर पोहचले आहे. प्रदूषणाचा सरळसरळ परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर पडत आहे. आता तरुणांपासून वयोवृध्द व महिलांपर्र्यत तंबाखूजन्य पदार्थाचा विळखा पोहचल्याने नागरिकांचे आरोग्य पुन्हा धोक्यात आले आहे.बंदीचा केवळ फुगाचशासनाने सुगंधित तंबाखूवर बंदी घातली आहे. याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासन विभागाला दिली आहे. मात्र अगदी डोळ्यादेखत खुलेआम सुगंधित तंबाखूची विक्री पानटपऱ्यामधून केली जात असतानाही हा विभाग आपल्याच कार्यालयात अडकून पडला आहे. त्यामुळे शासनाने घातलेल्या बंदीचा कोणताही उपयोग झाला नसल्याचे दिसून येते. पालकांचे दुर्लक्षहीकारणीभूतअलिकडे मुलगा अगदी लहानवयातच गंमत म्हणून खर्रा खायला लागतो. कधी सिगारेटही ओढतो. पाल्यांचे हे कृत्य प्रत्येक वेळी घराबाहेरच होत असतात असे नाही. घरीदेखील खर्ऱ्याचा पालकांना वास येतोच. मात्र याकडे पालक दुर्लक्ष करतात. काही जण याबाबत विचारणा करतातही; मात्र बाब गंभीरतेने घेतली जात नाही. पुढे गंमत म्हणून केलेले हे व्यसन मुलांना व्यसनाधीन करून टाकते.