शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मजूर संस्थेच्या नावावर लाखोंचा गैरव्यवहार

By admin | Updated: March 10, 2016 01:22 IST

अंग मेहनतीने काम करणाऱ्या कुशल व अकुशल मजूर कामगार यांची आर्थिक स्थिती सुधारण्याकरिता

देवाडा खुर्द येथील प्रकार : बोगस प्रकरणावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न पोंभुर्णा : अंग मेहनतीने काम करणाऱ्या कुशल व अकुशल मजूर कामगार यांची आर्थिक स्थिती सुधारण्याकरिता आणि मजूर सहकारी संस्थेमार्फत सभासदांना रोजगार देऊन त्यांची आर्थिक परिस्थिती उंचावण्याकरीता शासनाने ग्रामीण स्तरावर मजूर सहकारी संस्थाची निर्मिती केली. परंतु, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उदासीन व भ्रष्ट कारभारामुळे या चांगल्या उद्देशाला हरताळ फासल्याचा प्रकार देवाडा खुर्द येथील साईकृपा मजूर सहकारी संस्थेच्या बोगस कारभारातून चव्हाट्यावर आला आहे.पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द येथे २१ फेब्रुवारी २०११ रोजी साईकृपा मजुर सहकारी संस्था स्थापन करण्यात आली. यामध्ये संस्थेची स्थापना करण्याविषयीची प्रथम सभा ५ नोव्हेंबर २००९ रोजी घेण्यात आली. या सभेला तक्रारकर्ते सभासद कोणीही उपस्थित नव्हते. तरीसुद्धा पोंभुर्णा येथील सहाय्यक निबंधक कार्यालयातील तत्कालीन कनिष्ठ लिपीक एस.आर. खांडरे यांनी सभा पार पडली. सभेला आपण मार्गदर्शन केल्याचे आपल्या स्वाक्षरीचे पत्र वरिष्ठांकडे पाठविले. सभासद नोंदणी केलेल्या सभासदांना याविषयी कुठलीच माहिती नाही, ते कनिष्ठ लिपीक खांडरे यांना ओळखत सुद्धा नाही तरीही त्यांनी आर्थिक व्यवहार करून यातील काही सभासदांना हाताशी धरून बोगस मजुर सहकारी संस्था नोंदणी करून देण्यात हस्तक्षेप केला आणि आपल्या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल केली. तसेच या ठिकाणी सहाय्यक निबंधक असलेले पुर्वीचे पी. एस. धोटे यांनी सुद्धा या प्रकरणाची कुठलीही शहानिशा न करता नोंदणीचे प्रमाणपत्र दिले. त्यामुळे ते सुद्धा तेवढेच दोषी असल्याचे समजते. धोटे यांच्यानंतर सद्यस्थितीत सहाय्यक निबंधक म्हणून कार्यरत असलेले सी. एच. उघडे यांनी सुद्धा वार्षीक आमसभेमध्ये कुठलीच चौकशी न करता खुर्चीवर बसूनच सभेचे वृत्तांत पाठविले काय, असा प्रश्न अन्यायग्रस्त सभासदानी केला आहे. एकंदरीत बोगस संस्थेची नोंदणी करून शासनाच्या लाखो रुपयाच्या निधीची वाट लावण्यात खांडरे, धोटे, उघडे हे दोषी असून बोगस संस्थाचालक पी.के. बुरांडे, रूमाजी बुरांडे, एस. सी. नैताम, धनराज कोहळे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी तसेच संबंधीत प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी अन्यायग्रस्त सभासदांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)