शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेची सभा अर्ध्या तासात गुंडाळली

By admin | Updated: July 22, 2014 23:56 IST

जिल्हा परिषदेने २०१४-१५ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने सादर केला होता. यात सुधारणा किंवा मंजुरी देता आली नव्हती.

चंद्रपूर : जिल्हा परिषदेने २०१४-१५ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने सादर केला होता. यात सुधारणा किंवा मंजुरी देता आली नव्हती. त्यामुळे मंगळवारी विशेष सभा आयोजित करून मागील अल्पसंकल्पातील त्रुट्या दूर करून अवघ्या अर्ध्या तासात सभा गुंडाळली.जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष कुंभरे यांच्या अध्यक्षतेथाली दुपारी १ वाजता सभेला सुरुवात झाली. प्रथम मागील अल्पसंकल्पावर चर्चा केल्यानंतर त्यातील त्रुट्या दुरुस्त करण्याचे अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्षांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी आचारसंहितेच्या काळात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात काही विभागाकडून सुधारणा करण्याच्या सूचना आल्या होत्या. मात्र तत्कालीन उपमुख्य कार्यपालन अधिकारी गिरी यांनी विभागाकडून आलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे गिरी यांच्या विरोधात आयुक्तांकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती कुंभरे यांनी दिली.शेतामध्ये उत्पादित माल बाजार समितीत विक्रीला आणणे सोयीचे व्हावे म्हणून जिल्हा शेष फंडातून ‘फायबर कॅरेट’ देण्याची योजना जि.प. सदस्य वानखेडे यांनी सर्वसाधारण सभेत लावून धरली होती. जिल्हा परिषद अध्यक्षांसह मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी शेतकरी हिताच्या या योजनेला मंजुरी दिली आहे. सध्यास्थितीत शेतकऱ्यांना ताडपत्री, सौरकंदिल व कुंपणासाठी काटेरी तार पुरविले जातात. त्यामुळे फायबर कॅरेट पुरवून शेतकऱ्यांचा शेतमाल योग्य राहावा आणि त्याची चांगल्या पद्धतीने वाहतूक व्हावी, हाच या योजनेमागील उद्देश असल्याचे वानखेडे म्हणाले. दरम्यान, जिल्हा परिषदेने यावर्षी सदस्यांना देण्यासाठी लेदर बॅगची खरेदी केली. मात्र त्या बॅग सदस्यांना दिल्या नसल्याने संताप व्यक्त केला गेला. (नगर प्रतिनिधी)