शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरातील समस्यापूर्तीसाठी संयुक्त विकास समितीची बैठक

By admin | Updated: December 27, 2014 01:26 IST

चंद्रपूर शहरातील समस्यापूर्तीसाठी संयुक्त विकास समितीची बैठक नुकतीच पार पडली. शंकरराव सागोरे यांच्या अध्यक्षतेखाली नगिनाबाग परिसरात ही बैठक झाली.

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील समस्यापूर्तीसाठी संयुक्त विकास समितीची बैठक नुकतीच पार पडली.शंकरराव सागोरे यांच्या अध्यक्षतेखाली नगिनाबाग परिसरात ही बैठक झाली. त्यात शहराच्या विकासाबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता लवकरच धरणे आंदोलन करण्याचा निर्धार घेण्यात आला. समितीचे अध्यक्ष पांडुरंग गावतुरे, सचिव प्रभाकर अगळे, भैय्यासाहेब तोतडे, प्रा. सुरेश विधाते, हरिदास देवगडे, प्रा. अंबादास रायपुरे, बापुराव गोहोकार, निलेश पाझारे, प्रा.पी.एल. डोंगरे, मधुकर दानव, परशुराम ठोंबरे, भाऊराव हिवरे, शंकर कुंडले, यादव सपाट, अ‍ॅड.प्रमोद आनंद, कुशाब कायरकर, रंगाचारी माडघुसी, प्रा. रविंद्र चिलबुले, प्रकाश चांभारे, जेंगठे आदी सभेला उपस्थित होते.चंद्रपूर शहराला जवळपास ५०० वर्षांचा इतिहास आहे. औद्योगिक जिल्हा असल्यामुळे लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. परकोटाच्या आत मुख्य बाजारपेठ आहे आणि ते फक्त दोनच मुख्य रस्त्यावर आहे. शहरात पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहने जिथे जागा दिसेल तिथे नागरिक पार्किंग करीत आहे. परकोटाच्या बाहेर चंद्रपूर शहरात अनेक कॉलोन्या, वसाहती झालेल्या आहेत. जटपुरा गेटजवळील रघाताटे यांच्या घरापासून ते ठक्कर कॉलनीपर्यंत ३० फुटांचा रस्ता आहे. ही जुन्या काळाची पांदन आहे. या रस्त्यावर बहुतेक ठिकाणी अतिक्रमण आहे. बिनबा गेट ते रामनगरकडे जाणाऱ्या मोठ्या रस्त्यावर अतिक्रमण झालेले आहे. त्याचप्रमाणे रामनगर ते आंबेडकर कॉलेजपर्यंत जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर अतिक्रमण झालेले आहे. या तिनही मुख्य रस्त्यावर जे अतिक्रमण झालेले आहे ते हटविणे महानगर पालिकेची जबाबदारी आहे. चंद्रपूर मनपाकडे मुख्य रस्ते किती फुटाचे आहेत. त्याबातची नोंद असतानाही अतिक्रमण कां हटविले जात नाही? असा प्रश्न या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी)