शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

भद्रावती येथे मध्यस्थी जनजागृती

By admin | Updated: June 25, 2017 00:40 IST

मेडीएशन मॉनिटरिंग कमिटी, मेन मेडीएशन सेंटर, उच्च न्यायालय, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर यांच्या निर्देशान्वये...

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : मेडीएशन मॉनिटरिंग कमिटी, मेन मेडीएशन सेंटर, उच्च न्यायालय, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर यांच्या निर्देशान्वये तालुका विधी सेवा समिती भद्रावती व तालुका विधिज्ञ संघ भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी व फौजदारी न्यायालय भद्रावती येथे ‘मध्यस्थी जनजागृती’ या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमाचे उद्घाटन दिवाणी न्यायाधीश निनाद अ. इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. तर रिर्सोस पर्सन म्हणून शैलेश कंठे तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका विधिज्ञ संघाचे अध्यक्ष यू.ए. पलीकुंडावार व सचिव अ‍ॅड. जी.पी. मोरे उपस्थित होते.यावेळी सह दिवाणी न्यायाधीश शैलेश कंठे उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले, मध्यस्थी म्हणजे जो पक्षकारामधील असणारा वाद, तंटा परस्पर संमतीने सोडविण्याकरिता मदत करतो. मध्यस्थी एक गोपनीय, ऐच्छिक परस्पर सहभाग असणारी लवचिक प्रक्रिया आहे. मध्यस्थी कोणताही तोडगा थोपवित नाही. मध्यस्थी प्रक्रियेमध्ये वकिलांचा सहभाग देखील अत्यंत महत्त्वाचा असून किंबहूना मध्यस्थीद्वारे संपविणे, याबाबतचे योग्य मार्गदर्शन हे वकील पक्षकारांना करीत असतात तसेच मानसिकदृष्ट्या समाधान मिळून, विविध मुद्यातील दरी कमी करून ‘जिंकलो व हरलो’ असा भाव न राहता सन्मानपूर्वक निकालाचा अवलंब करून, दुरावलेली मने पुन्हा स्नेहात बांधली जातात. मध्यस्थीमुळे लवकर निकाल लागून सामाजिक स्वास्थ सुधारते, सौहार्दाता वाढते, कमी खर्च, पैशाची व वेळेची बचत तसेच संपूर्ण कोर्ट फी परत मिळून पक्षकारांना याचा लाभ होतो. वैवाहिक प्रकरणातील असलेले हेवे-दावे मिटविण्याचा प्रयत्न किंवा नात्यातील गोडवा पुन्हा प्रस्थापित करण्याकरिताच आपला प्रयत्न नव्याने संसाराची घडी बसविणेसाठी पती-पत्नीमधील वाद न्यायालयात असण्यापेक्षा मध्यस्थी मार्फत मिटविणे योग्यच होईल असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन अ‍ॅड. व्ही.एस. सूर्तीकर यांनी केले.